Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCrimeUpdate : अश्लील व्हिडीओ कॉल करून थेट आमदारालाच गंडवण्याचा प्रयत्न !!

Spread the love

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना फसवणाऱ्या टोळीने चक्क आमदार महोदयांनाही सोडले नसल्याच्या प्रत्यय मुंबानगरीत आला आहे. या प्रकरणात मुंबईचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप प्रकाश सुर्वे यांनी केला. या व्हिडीओमध्ये एक महिला अश्लील कृत्य करताना दिसत होती आणि नंतर त्याच नंबरवरून एका व्यक्तीने त्यांचा मॉर्फ केलेला व्हिडीओ पाठवून आमदार महोदयांनाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

दहिसर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आमदार प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे कि , मी अनेकांचे फोन उचलतो आणि आणि मदतीसाठी विचारणा करणाऱ्या अनेक व्हॉट्सअॅप मेसेजला उत्तर देत असतो . दरम्यान त्यांना यांना ११ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२० च्या सुमारास एका अनोळखी नंबरवरून एक व्हॉट्सअॅप मेसेज आला, ज्यामध्ये हॅलो, कसे आहात, असे एकाने व्यक्तीने म्हटले होते. पुन्हा १३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास त्यांना हाय असा आणखी एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. हे मेसेज अनोळखी नंबरवरून आल्याने सुर्वे यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.

पुढे असे घडले…

दरम्यान १६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.१० च्या सुमारास, प्रकाश सुर्वे यांना त्याच नंबरवरून आणखी एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. त्यावेळी आरोपीने “हॅलो, क्या हुआ जी” असे म्हटले. त्यानंतर लगेचच प्रकाश सुर्वे यांना व्हिडिओ कॉल आला. “सुरुवातीला मी फोन घेतला नाही, पण दुसरा कॉल आल्यावर मी तो घेतला,” असे सुर्वे यांनी पोलिसांना सांगितले. व्हिडिओ कॉलवर एक महिला अश्लील कृत्य करत होती. “काय घडत आहे हे लक्षात येताच मी लगेच कॉल कट केला. मला त्या नंबरवरून वारंवार फोन आले आणि मी त्या व्यक्तीला उत्तर दिले की मला फोन करू नका अन्यथा मी पोलिसात तक्रार करेन,” असे सुर्वे यांनी पोलिसांना सांगितले.त्यानंतर आरोपींनी सुर्वे यांचा फोटो दुसऱ्या व्यक्तीसोबत मॉर्फ करून त्यांना पाठवून ५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करु, असे आरोपींनी धमकी दिल्याचे सुर्वे यांनी सांगितले.

या सर्व प्रकरणात आपल्याला ब्लॅकमेल केले जात असल्याचे लक्षात येताच, त्यांनी ४ डिसेंबर रोजी दहिसर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिल्यानंतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ५०० (बदनामी), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ६६ ई (गोपनीयतेचे उल्लंघन) आणि ६७ अ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभेतील शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्या आधी शिवसेनेचे कुर्ला-नेहरुनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनाही हनीट्रॅप करुन पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोसमदिन दिन महोम्मद खान नामक इसमाला मुंबईच्या सायबर पोलिसांनी अटक केली होती. असे अटक केलेल्या आरोपीचे नाव होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!