Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : पुन्हा लसीकरण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र दोन आरटीओ एजंट अटक

Spread the love

औरंगाबाद – कोव्हिड चे लसीकरण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र तयार करुन विक्री करणार्‍या दोन आरटीओ एजंटांना गुन्हेशाखेने बेड्या ठोकल्या.त्यांच्या ताब्यातून ५लाख १०हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शेख मिनाजुद्दीन शेख अशफाकुद्दीन(२६) रा.सिल्कमिल काॅलनीतर अदनानउल्ला मुजीब बेग(२०) रा.शहानगर बीडबायपास अशी अटक एजंटांची नावे आहेत. लसीकरण झाल्यानंतर वितरित होणारे प्रमाणपत्रावर एडीटिंग करुन वरील दोन आरोपी २००ते ६००रु. ना एक सर्टफिकेट विकंत होते.गेल्या दोन वर्षात अंदाजे ५ते१०लाख रु.यामार्गाने कमवल्याचे पोलिसांना आरोपींनी माहितीतून समोर आले. दोनच दिवसांपूर्वी जिन्सी पोलिसांनी दोन शासकिय डाॅक्टरांना बोगस प्रमाणपत्र वितरित केल्या प्रकरणी अटक केली आहे.

आरोपींच्या ताब्यातून एक कार, प्रिंटर, लॅपटाॅप असे साहित्य जप्त केले. वरील कारवाई पोलिसआयुक्त डाॅ निखील गुप्ता, पोलिसउपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिसआयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, पीएसआय दत्ता शेळके आणि त्यांच्या पथकाने कारवाई पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!