Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : अशी आहे राज्याची आजची कोरोनाची अवस्था

Spread the love

मुंबई : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या २४ तासात  दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून आजच्या मृत्यूसंख्येतही घट पाहायला मिळत आहे. दरम्यान  कोरोनातून ब-या  होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र आज कालच्या तुलनेच कमी आहे. आज राज्यात एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ५८५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ७८९ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या  ६ हजार ४८२ इतकी आहे. 

दरम्यान राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ९० हजार ३०५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ६५ लाख १७ हजार ३२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ४१ हजार ६७७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ९.९८ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ७४ हजार ३५३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार २११ इतकी आहे.

मुंबईत आज २१९ नवे रुग्ण

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज बुधवारी २१९ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे.  मुंबईतील कोरोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७ लाख ६४ हजार ६५४ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत मुंबईत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ३५४ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात आज मंगळवारी ११९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात १०, ठाणे महापालिका क्षेत्रात ४६, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ३७, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ११, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात ३, भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात १ मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात ११ रुग्ण आढळले आहेत. तर, पालघरमध्ये आज २ रुग्ण आढळले असून, वसईविरार मनपा क्षेत्रात १६, रायगडमध्ये १२ आणि पनवेल मनपा क्षेत्रात ९ नवे रुग्ण आढळले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!