Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : ओमायक्रॉनला भारतीयांनी गांभीर्याने घेण्याची गरज , मास्क काढण्याची वेळ अजून आली नाही : डॉ. व्ही. के . पॉल

Spread the love

नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटच्या परिणामाचा अंदाज लावता येत नसल्याने जगभरात भितीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा हा हा व्हेरिएंट आधीच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा कमी घातक असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप त्याचा पूर्ण अभ्यास होणे बाकी असल्यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक अजूनही छातीठोकपणे निर्धोक राहण्याचा सल्ला देत नाहीत. शिवाय, ओमायक्रॉन हा सर्वाधिक वेगाने संक्रमित होणार व्हेरिएंट असल्यामुळे अवघ्या २० दिवसांत तो ५७ देशांमध्ये पसरला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांना नीती आयोग आणि कोरोनाबाबतच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी नागरिकांना ओमायक्रॉनला गांभीर्याने घ्यावे तसेच मास्क काढण्याची वेळ अजून आलेली नाही असे आवाहन केले आहे.

या संदर्भात आरोग्य विभागाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. व्ही. के. पॉल यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार आणि भारतीयांकडून कोरोनाच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यावर भाष्य करताना चिंता व्यक्त केली आहे. पॉल यांनी म्हटले आहे कि , “भारतात मास्क घालण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की लस आणि मास्क या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. आपण जागतिक परिस्थितीपासून शिकायला हवे . आपण सध्या या बाबतीत डेंजर झोनमध्ये आहोत आणि अतिशय जोखमीच्या आणि अस्वीकारार्ह अशा पद्धतीने वर्तणूक होऊ लागली आहे”.

दरम्यान डॉ. व्ही. के. पॉल यांनी देशवासीयांना मास्क न काढण्याचे आवाहन केले आहे. “जागतिक आरोग्य संघटना सातत्याने मास्कचा वापर कमी होत असल्याबद्दल सतर्क करत असून ओमायक्रॉनचा जागतिक पातळीवर वेगाने होणारा प्रसार चिंता वाढवणारा आहे. मास्क आणि लस या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून अद्याप मास्क काढण्याची वेळ आलेली नाही”, असेही त्यांनी नमूद केले आहे.

स्वतःची काळजी घेणे आवश्यक

कोरोनाच्या साथीमध्ये अनेक सरप्राईजेस असल्याचे सांगून डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे कि , “ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे ब्रिटन आणि फ्रान्समध्ये करोनाची मोठी लाट आली आहे. करोनाच्या विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत खूप साऱ्या अनपेक्षित गोष्टी घडत आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेणं फार आवश्यक आहे”.

दरम्यान ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभर चिंता व्यक्त केली जात असताना सध्या अस्तित्वात असलेल्या लसी ओमायक्रॉनवर प्रभावी ठरतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर डॉ. पॉल यांनी स्पष्ट मत मांडलं आहे. “सध्याच्या लसी कोरोनाच्या अस्तित्वात असलेल्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी ठरतील. करोनाचे व्हेरिएंट अजून इतके स्मार्ट झालेले नाहीत की ते लसीमुळे तयार झालेलं सुरक्षा कवच भेदू शकतील”, असं ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!