Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : मोबाईल न दिल्याच्या रागातून ‘त्याने’ अल्पवयीन भावाच्या डोक्यात घातला दगड !!

Spread the love

औरंगाबाद :  वाळूज पोलिसठाण्याच्या हददीत अपहरण झालेल्या अल्पवयीन तरुणाचा त्याच्याच अल्पवयीन भावाने मोबाईल मिळवण्यासाठी खून केला. त्यासाठी बालन्यायालयाकडे कायदेशीर सल्ला घेऊन वयस्क आरोपीप्रमाणे शिक्षेसाठी पत्रव्यवहार करणार असे स्पष्टीकरण सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ यांनी दिले.
१ डिसेंबर रोजी वाळूज पोलीस ठाण्यात धामोरीशिवारातील अंकुश प्रकाश म्हैसमाळे (१६) याचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या अपहृत मुलाचा मृतदेह पैठण औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हददीत ३ डिसेंबर रोजी विहिरीत सापडला. पोलीस तपासात हा खून त्याचा अल्पवयीन आत्येभाऊ राजू(नाव बदलले) यानेच केल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखालीएपीआय शेळके या प्रकरणाचा अधिक तपस करीत आहेत.

त्याचे झाले असे कि , मयत अंकुश ला आजोबांनी नवीन मोबाईल घोन विकत घेऊन दिला होता. तो राजुला हवा होता मयत अंकुश हा भोळा असल्यामुळे ३० नोव्हेंबर रोजी राजुच्या सांगण्यावरून त्याच्या सोबत ढोरकीन शिवारात गेला त्याठिकाणी फोटो काढण्याचा बहाणा करत राजू ने अंकुश ला विहिरीत ढकलले व तो परत वर येत असतांना त्याच्या डोक्यात दगड टाकून मोबाईल घेऊन पसार झाला या प्रकरणाची नोंद पैठण औद्योगिक पोलिसांनी घेत प्रकरण पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांचा परवानगीने वाळूज पोलिसांना वर्ग केले.

या आधीही घडली दोन प्रकरणे

यापूर्वी दोन महिन्याच्या काळात मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हददीत अल्पवयीन मुलानेच वडिलांचा  झोपेत खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले या व प्रकरणी गुन्हे शाखेने तपास पूर्ण करत अल्पवयीन आरोपीला वयस्क आरोपीप्रमाणे शिक्षा मिळावी यासाठी बालन्यायालयाकडे पत्र व्यवहार केल्याची माहिती गुन्हे सशाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी दिली. तसेच दोन दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्याच्या हददीत सख्या बल्पवयीन भावाने प्रेमविवाह  केलेल्या बहिणीचे शीर धडा वेगळे केले. या प्रकरणात पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली बाळ न्यायालयाकडे पत्रव्यवहार कारण्यासाठी शिफारस उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती करणार असल्याचे म्हणाले.

निर्भया प्रकरणानंतर आलेला कायद्या प्रमाणे २०१५ साली तयार झालेला कायदा निवृत्त न्यायमूर्ती वर्मा यांचा अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सूचना केल्या होत्याकी, निर्घृण  हत्या किंवा गंभीर गुन्हे करणाऱ्या १६ वर्षे वयापुढील सर्व आरोपिंना वयस्क आरोपीप्रमाणे शिक्षा देण्यात याव्यात कलम १५ आणि १८ मधील तरतुदी प्रमाणे कलम १२ मध्ये अशीही तरतूद आहे की, एखाद्या अल्पवयीन गुन्हेगाराचे एखाद्या मोठया गुन्हेगारांशी किंवा गॅंग शी संबंध तपासात निष्पन्न झाले तर त्या अल्पवयीन गुन्हेगाला  जामीन देता येत नाही.
– एड . नागनाथ कोडे 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!