Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात ७ ठार

Spread the love

कोईम्बतूर : भारतीय हवाई दलाचे  हेलिकॉप्टर तामिळनाडूत दुर्घटनाग्रस्त झाले असल्याचे वृत्त आहे. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत देखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हवाई दलाने या माहितीला दुजोरा दिला आहे.

या अपघातातात ४ जण ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती असून जनरल बिपीन रावत जखमी असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे वृत्त समजताच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन कोइम्बतूरला पोहोचण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य अद्याप जारी असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.

या हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास होते. यामध्ये बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या असे  सांगितले जात आहे. यामधील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हवाई दलाकडून चौकशीचा आदेश

हवाई दलाने बिपीन रावत या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते याला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचं हवाई दलाने सांगितले  आहे. दरम्यान दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या दुर्घटनेत चौघांचा  मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे.

पंतप्रधान मोदी यांना राजनाथसिंग यांनी दिली माहिती

दिल्लीत कॅबिनेट बैठक सुरु असून यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घटनेची माहिती दिली आहे.दरम्यान या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून चौघे जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना वेलिंग्टन येथील लष्कर रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!