Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : गुन्हे शाखेची कारवाई पोलिसठाण्याजवळील देहविक्रीचा अड्डा उध्वस्त केला

Spread the love

औरंगाबाद – उस्मानपुरा भागातील सिटीचाॅईस स्पा मधे देहविक्रय करवून घेणार्‍या मित्राला त्याच्या मैत्रीणीसोबंत गुन्हेशाखा आणि उस्मानपुरा पोलिसांनी पकडले.त्यांच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पिटा अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख फईम शेख हुसेन(३०) रा.बायजीपुरा व कोटला काॅलनीत राहणारी महिला असे दोन अटक आरोपी आहेत.त्यांच्या ताब्यातून ४७हजार ७००रु.मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उस्मानपुरा पोलिस ठाण्याजवळ सिटीचाॅईस स्पा सेंटर गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होते.याची माहिती गुन्हेशाखेला मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके, पोलिस कर्मचारी संजीवनी शिंदे आणि पथकाने कारवाई पार पाडली. या प्रकरणी महिला पोलिस संजीवनी शिंदे यांनी तक्रार दिली.तर एपीआय राहूल सूर्यतळ यांनी गुन्हा दाखल केला. पुढील  तपास पोलिस निरीक्षक गीता बागवडे करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!