Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MahaparinirvanDinUpdate : समीर वानखेड यांना चैत्यभूमीवर भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे नेते रोखतात तेंव्हा….!!

Spread the love

मुंबई : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  दादर येथील चैत्यभूमीवर राज्यातील मंत्री, नेते यांच्यासह हजारो अनुयायांनी उपस्थिती लावत महामानवाला अभिवादन करीत आहेत. त्यात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे  यांनीही चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी आले तेंव्हा काही भीमसैनिकांनी त्यांच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येण्याकरिता आक्षेप घेतला. यामुळे काही काळासाठी वाद निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा हे निमित्त साधून पत्रकारांना आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , समीर वानखेडे माझ्यासोबत नमाज पढायला नियमित यायचे. आज ते प्रथमच चैत्यभूमीवर प्रथमच दिसले.

चैत्यभूमीवर येण्याची गरज का भासली ?

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. त्याचे झाले असे कि , समीर वानखेडे यांनी यावर्षी दादर येथील चैत्यभूमीवर हजेरी लावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. मात्र, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने समीर वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा आणि  बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या विचारधारेवर चालले पाहिजे. समीर वानखेडेंना यंदा चैत्यभूमीवर येण्याची गरज का भासली, अशी विचारणा भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने केली. पोलिसांनी मध्यस्थी करून समीर वानखेडे यांना वाट मोकळी करून दिली आणि हा वाद मिटला.

यानंतर काही मिनिटांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक चैत्यभूमीवर पोहोचले. यावेळी पत्रकारांनी नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या बाबत विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

‘जय भीम इम्पॅक्ट’

नवाब मलिक म्हणाले कि , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. अभिवादन करणारा फक्त ठराविक समाजाचा, जातीचाच असायला हवा, असा समज असेल, तर तो चुकीचा आहे. मला वाटते की, आम्ही दरवर्षी इथे येतो. पण काही लोकांनी या वर्षीपासून यायला सुरूवात केली आहे. आता ‘जय भीम’ नावाचा एक सिनेमा आला आहे. हा सिनेमा तळागाळातल्या समाजाचा संघर्ष दाखवणारा आहे. त्याप्रमाणेच मी जो संघर्ष सुरू केलेला आहे, त्याचा ‘जय भीम इम्पॅक्ट’ सुरू झाला आहे. त्यामुळे लोक अभिवादन करायला यायला लागले आहेत. समीर वानखेडे हे इतक्या वर्षात कधी चैत्यभूमीवर  अभिवादनाकरिता आले का नाही, हे मला माहित नाही; पण, ते माझ्यासोबत नमाज पढायला नियमितपणे यायचे हे माहिती आहे. असा टोला या निमित्ताने लगावला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!