Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

OmicronIndiaUpdate : देशात येऊ शकते तिसरी लाट , केंव्हा ? कधी आणि कशी ? काय आहे संशोधकांचा अंदाज ?

Spread the love

नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटची माहिती जगासमोर आल्यानंतर या व्हेरिएंटची तीव्रता अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी यामुळे देशात कोरोनाची सौम्य तिसरी लाट, जानेवारीमध्ये देशात येण्याची शक्यता आयआयटी कानपुर आणि हैद्राबाद येथील संशोधकांनी वर्तविली आहे. त्यांच्या गणितीय संशोधनानुसार कोरोना संक्रमण कमी होण्यापूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते शिखरावर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या विषयीच्या अधिक वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन प्रकाराच्या उद्रेकाच्या सध्याच्या परिस्थितीवर आधारित ‘सुत्रा’मॉडेलच्या प्राथमिक अंदाजानुसार, या वर्षाच्या मार्च/एप्रिलमध्ये झालेल्या लक्षणीय डेल्टा लाटेच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य असेल. या वर्षाच्या मार्च/एप्रिलमध्ये दररोज सुमारे ४ लाख रुग्ण आढळत असताना दुसऱ्या लाटेदरम्यान दररोज कोविड संसर्गाने उच्चांक गाठला होता. ‘सुत्रा’ प्रोजेक्शन मॉडेलने सूचित केले आहे की ओमायक्रॉनमुळे येणारी तिसरी लाट जानेवारी ते मार्च दरम्यान दररोज सुमारे २ लाख कोविड संसर्गाच्या शिखरावर पोहोचू शकते.

डॉ. एम. विद्यासागर, एसइआरबी, राष्ट्रीय अध्यक्ष, आयआयटी हैदराबाद यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हटले आहे कि , ज्यांनी या सूत्र मॉडेलची स्थापना केली त्यानुसार “हे अंदाज आरोग्य अधिकारी आणि सरकारांना येत्या काही महिन्यांच्या तयारीसाठी दिशा देण्यासाठी आहेत. मला वाटते की भारतातील सरासरी दैनंदिन संसर्ग दीड लाख ते २ लाखांच्या दरम्यान असेल आणि ४ लाखांपर्यंत पोहोचू शकणार नाही किंवा ओलांडू शकणार नाही, जे दुसऱ्या लाटेदरम्यान झाले होते. तथापि, हे अंदाज अनेक निष्कर्षांवर आधारित आहेत, कारण ओमायक्रॉनबद्दलचा डेटा अगदी नवा आहे,”

याशिवाय आयआयटी कानपूरचे प्रमुख संशोधक, जे सूत्र मॉडेलचे सह-संस्थापक आहेत त्या डॉ मनिंद्र अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार , “आतापर्यंतचे पुरावे असे सूचित करतात की पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात सौम्य तिसरी लाट येईल. डेल्टा व्हेरिएंटच्या प्रसारादरम्यान निदर्शनास आल्याप्रमाणे, रात्रीचा कर्फ्यू तसंच सौम्य लॉकडाउन, गर्दीवर निर्बंध विषाणूच्या प्रसाराची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, ज्यामुळे रुग्णसंख्याही नियंत्रणात राहील”.

१०० टक्के लसीकरण करणारे पहिले राज्य

दरम्यान देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असताना , देशात कोरोनाविरुद्ध १०० टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. यासंदर्भात राज्याच्या एका अधिकृत प्रवक्त्याने शनिवारी दावा केला आहे. त्यानुसार या राज्यात तब्बल ५३,८६,३९३ पात्र लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ऑगस्टच्या अखेरीस पात्र १०० टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देणारं हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्वीट करून जनतेचं अभिनंदन करताना म्हटले आहे कि , “आज आपल्या हिमाचलने आणखी एक इतिहास रचत देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. पात्र नागरिकांना कोविड लसीचा दुसरा डोस देऊन हिमाचलने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील सर्व जनतेचे हार्दिक अभिनंदन आणि आरोग्य विभाग/टीमचे आभार,”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!