Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबई लोकल सेवा अशी राहील

Spread the love

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनानं लोकल रेल्वेची विशेष सोय केली आहे. उद्या रेल्वेकडून ८ उपनगरीय विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ६ डिसेंबरला दादरमध्ये येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी रेल्वेकडून विशेष सुविधांचे नियोजन करण्यात आलं आहे. ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरिता ८ उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.

असे असेल विशेष लोकलचे वेळापत्रक

१. कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विशेष कल्याण येथून 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल.
२. कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.45 वाजता पोहोचेल.
३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 3.00 वाजता पोहोचेल.
४. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 4 वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावरील विशेष सोय

१. पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल.
२. पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.50 वाजता पोहोचेल.
३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 3.00 वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 4.00 वाजता पोहोचेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!