Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#AurangabadUpdate | भगवान फार्मसी महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचे खंडपीठाचे उच्च तंत्र शिक्षण संचालकांना निर्देश

Spread the love

औरंगाबाद : सहावा वेतन आयोगा प्रमाणे भगवान फार्मसी महाविद्यालयातील कर्मचारी व प्राध्यापकांना वेतनश्रेणी अदा न केल्यामुळे उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांनी व्यवस्थापन हस्तांतरीत का करू नये अशा आशयाची महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावावी व तेथील प्राध्यापक वृंद व कर्मचाऱ्यांचे मत विचारात घेऊन निर्णय घ्यावा असे आदेश न्यायमूर्ती एस.जी. गंगापूरवाला व आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने जारी केले आहेत.

गेल्या २००६ साला पासून भगवान फार्मसी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना साहवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन अदा न केले गेल्या प्रकरणी फार्मसी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यानी २०१९ साली याचिका खंडपीठात दाखल केली होती खंडपीठाने या प्रकरणी आदेश दिले होते की, कर्मचार्यांना सहावा वेतन आयोगा प्रमाणे वेतन अदा करावे, या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले पण या आदेशाला फार्मसी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली. त्यानंतर यूजीसी ने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला भेट देत महाविद्यालयाची विद्यार्थयांना प्रवेश देणयाची परवानगी रद्द करत आहोत असे बजावले. तरीही महाविद्यालयाने आवश्यक टी पावले ना उचलल्यामुळे खंडपीठाने वरील आदेश २६ नोव्हेंबर रोजी जारी केले या प्रकरणी याचिकाकर्ते नानासाहेब धरबाळे यांचया वतीने एड पुष्कर शेंदुर्णीकर यांनी काम पाहिले तर  महाविद्यालयाच्या वतीने एड.कार्लेकर , एस. जी चपळगावकर, सी.व्ही.  धारूरकर यांनी काम पाहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!