Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadCrimeUpdate : कथित मांत्रिकाने दिली ‘कोंबडा ‘बनविण्याची धमकी , कापड व्यापाऱ्याला १० लाखांचा लावला चुना !!

Spread the love

औरंगाबाद : कौटुंबिक कटकटीला वैतागलेल्या कापड व्यापाऱ्याला मानवतच्या तीन भोंदूंनी १० लाख रु. ना गंडवले या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अनिष्ट अघोरी प्रथा समूळ उच्चाटन कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सीताराम, शंकर, आणि आसिफ कुरेशी तिघेही रा. मानवत अशी गुन्हा दाखल झालेल्या भोंदूंची नावे आहेत. गवळीपुरा छावणी येथे जून २०२१ ते १२ नोव्हेंबर २१ या काळात व्यापाऱ्याला फसवल्याचे पोलिसांनी सांगितले .


त्याचे झाले असे कि ,शेख रफत शेख करीम (३४) रा गवळीपुरा या प्रकरणातील फिर्यादी असून घरातील आई व पत्नीच्या रोजच्या कटकाटीला वैतागले होते. त्यांनी हा प्रकार त्यांचा परभणी येथील मित्र सय्यद अमीर स गुलाब याला सांगितला . त्याने हा गंभीर प्रकार असल्याचे सांगत मानवतच्या प्रसिधद सायली मांत्रिकाचा मोबाईल नंबर दिला . त्याने रफ त यांना बिझी असल्याचे सांगत त्याचा लहान भाऊ सीताराम यांच्याशी संपर्क करायचा सांगितला सीताराम शी संपर्क झाल्यावर त्याने त्याचे दोन साथीदार शंकर व आसिफ कुरेशी यांना सोबत घेत गवळीपुरा शेख राफात यांचे घर गाठले घर पाहून ‘घरात सापाचा साया असून अंदाजे ९०किलो गुप्त धन आहे…’ अशी थाप मारली व घरात खडडा खोदून एक भाला मोठा साप काढला व गुप्तधन काढायचे असल्यास पैशांची मागणी केली.

दरम्यान शेख रफात यांनी आरोपीच्या भूलथापांना बळी पडत ५ तोळे सोने ज्याची किंमत २लाख ९३ हजार व ७ लाख रु रोख आरोपीच्या हवाली केले. आरोपीनी पूजेचा बहाणा करत ११ दिवसांनी परत येतो असे सांगून धूम ठोकली . वरील भोंदू परत न आल्यामुळे शेख रफात यांनी मानवत ला जाऊन आरोपीची भेट घेतली तेंव्हा आरोपीनी शेख रफात यांना समशानभूमीत नेत एका जळत असलेल्या मृतदेहाचे समोर पैशे मागशील तर कोंबडा प्राण्यात अघोरी विद्येने रूपांतर करेन अशी धमकी देत हाकलून दिले. शेवटी २७ नोव्हेंबर रोजी शेख रफात यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या प्रकरणात शहरातील तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या आदेशाने एक पथक मानवत ला जाणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

‘मानवत’ची अशीही आठवण

५० वर्षांपूर्वी गुप्तधनासाठी मानवतच्या मांत्रिकांनी नरबळी दिला होता.दै.मराठवाडा ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले.आजही मराठवाड्यात असे अनएक्सप्लेन प्रसंग घडतात.जे उघडकीस येतात.त्यावर पोलिस कारवाई होते.जे येत नाहीत त्याच्या दंतकथा होतात.व त्या चवीने चर्चील्या जातात.हे पुरोगामी महाराष्र्टाचे दुर्देवी चित्र आहे.
निळू दामले, जेष्ठ पत्रकार

आपलं सरकार

Click to listen highlighted text!