Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या कुटुंबीयांना राज्य शासन करणार ५० हजार रुपयांची मदत

Spread the love

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारने आज कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या कुटुंबीयांना राज्य शासन ५० हजार रुपयांची मदत करणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे.

याबाबत वडेट्टीवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , “कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार ) इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमीत करण्यात आला आहे.”

तसेच, “मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचे नातेईवाईक राज्य शासना द्वारे विकसित करण्यात येत असलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन, किंवा सेतू केंद्रात, ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.” अशी माहिती देखील वडेट्टीवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

आरटीपीसीआर/ मॉलेक्युलर टेस्ट/आरएटी या चाचण्यांमधून पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररूग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे क्लिनिकल डायग्नोसिस कोविड -१९ असे झाले होते, त्याच व्यक्तीचे प्रकरण करोना मृत्यू प्रकरणासाठी कोविड प्रकरण म्हणून समजण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!