Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बंगळुरुवरुन पाटणाला जाणाऱ्या १३५ प्रवाश्यांची आपत्कालीन लँडीग

Spread the love

बंगळुरुवरुन पाटणाला जाणाऱ्या गो फर्स्ट एअरवेजच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत लँडीग करण्यात आले आहे. यावेळी विमानात चालक दलासह १३५ प्रवाशी प्रवास करत होते. या सर्वांसह या विमानाचे सुखरूपपणे आपात्कालीन लँडिग करण्यात आले आहे.

गो फर्स्ट एअरवेजचे प्रवासी विमान बंगळुरुवरुन पाटणाला जात असताना विमानाच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान नागपूरच्या दिशेने वळवण्यात आले. ज्यानंतर नागपूर विमानतळावर सुरक्षेचा उपाय म्हणून विमानाचे आपात्कालीन लँडिग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशांना नागपूर विमानतळावर उतरवण्यात आल्यानंतर तिथेच त्यांना अल्पोपहार देण्यात आला आहे. तसेच त्यांना पाटणाला जाण्यासाठी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी एक खास विमान सोडण्यात येणार आहे. दरम्यान, या विमानाचे सध्या अभियांत्रिकी टीमकडून विमानाची तपासणी करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!