Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

यंदाचा व्हॅलेंटाईन डे ‘वन फोर थ्री’ चित्रपटासोबत होणार साजरा

Spread the love

प्रेमाची अनोखी केमिस्ट्री ‘वन फोर थ्री’ चित्रपटातून ११ फेब्रुवारीला झळकणार मोठ्या पडद्यावर


रोमँटिक चित्रपटांच्या चलतीमध्ये वन फोर थ्री चित्रपटानेही आपले नाव यादीत नोंदविले आहे, प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येत ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित ‘वन फोर थ्री’ हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेल्या नव्याकोऱ्या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई, पुणे येथे गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन समस्त चित्रपटाच्या टीमसह नव्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा प्रेमाचे विविध रंग मांडत या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिग्दर्शक, अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार असे पदार्पण करणार आहे. चित्रपटाच संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. हे आपलं काळीज हाय या ‘वन फोर थ्री’ चित्रपटाच्या टॅगलाईनने आधीच धुमाकूळ घातला असताना हा चित्रपट काय नवे घेऊन येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

चित्रपटाच्या पोस्टरच्या बातमी ऐकून नक्कीच सर्वांना आनंद झाला असेल यांत शंकाच नाही. हाच आनंद द्विगुणित करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कळली असून येत्या ११ फेब्रुवारी ला व्हॅलेंटाईन डे विकमध्ये हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे. याबद्दल बोलताना दिग्दर्शक योगेश भोसले असे म्हणाले की, या चित्रपटातून प्रेक्षकांना प्रेमाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन डे ‘वन फोर थ्री’ चित्रपटासोबत आनंदमयी जाईल असे आव्हान योगेश भोसले यांनी केले आहे. प्रेमाचे वेगळेपण या चित्रपटात काय अनुभवता येणार हे आता पाहणे रंजक ठरणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!