Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुंबईचे फरार घोषित माजी पोलीस आयुक्त पारंबीरसिंग पोलिसांना नव्हे पण ‘या’ वृत्त वहिनीला बोलले !!

Spread the love

मुंबई : फरार घोषित केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचा ठाव ठिकाणा अखेर लागला असून ते विदेशात नसून चंदीगड येथे असल्याचे वृत्त आहे. ‘टाईम्स नाऊने परमबीर यांच्याशी संपर्क साधून हि माहिती दिली आहे.विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले परमबीर सिंग त्यांचा तपास करणाऱ्या पोलिसांना बोलले नसले तरी पोलिसांना आपण पूर्ण सहकार्य करू असे या वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले आहे. 

दरम्यान परमबीर सिंग यांना मुंबईतील कोर्टाने कालच फरार घोषित केले आहे. गोरेगावमधील एका खंडणीवसुलीच्या प्रकरणात परमबीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून गुन्हे शाखेच्या वतीने न्यायालयात करण्यात आलेल्या विनंतीवरून परमबीर यांना फरार घोषित करण्यात आले. त्यांच्या जुहू येथील फ्लॅटच्या दरवाजावर याबाबतच्या आदेशाची प्रत चिटकवण्यात आली आहे. परमबीर यांना ३० दिवसांत हजर राहण्यास सांगण्यात आले असून ते हजर झाले नाहीत तर त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या २३१ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या परमबीर सिंग यांचा फोन आज सुरू झाला असून त्यांच्याशी संपर्कही झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

परमबीर यांचा मुक्काम चंदिगड येथे असून आपण लवकरच मुंबईत परतणार असल्याचे त्यांनी टाईम्स नाऊशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान आपण कोर्टाच्या आदेशाचे मी पालन करणार असून मी पोलिसांच्या तपासालाही पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परमबीर यांच्याविरुद्ध मुंबई आणि ठाण्यात विविध पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणीवसुलीसह अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असली तरी सुप्रीम कोर्टाकडून त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाले आहे. परमबीर यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात अटकेची कारवाई तूर्त करण्यात येऊ नये, असे कोर्टाने सोमवारी एका आदेशात नमूद केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!