Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate: सिटीचौक आणि बेगमपुरा पोलिसांची संयुक्त कारवाई, दोन महिलांसहित तिघांना बेड्या

Spread the love

नशेच्या गोळ्यांचा साठा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून जप्त एकाच कुटुंबातील , दोन महिलांसहित तिघांना बेड्या

औरंगाबाद- असेफिया कॉलनी -सादात नगरातून नशेच्या गोळ्या बाळगणाऱ्या ५ जणांना मंगळवारी संध्याकाळी ६वा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
१) शेख नययर शेख नईम,२) शेख नईमशेख महेबूब, ३)शकिरा शेख नईम ४)शेख नदीम शेख नईम सर्व रा. असेफिया कॉलनी ५) समीनाखान अब्दुल अमीना खान रा. सादात नगर रेल्वेस्टेशन अशी अटक आरोपीची नावे आहेत.आरोपीमध्ये आई वडील दोन मुले व विवाहित मुलगी यांचा समावेश आहे. यातील पुरुष आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्या ताब्यातून ६०० गोळ्या व ६ हजार ५०० रु. रोख जप्त करण्यात आले. वरील कारवाईत पोलीस उपायु क्त उज्वला वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक गिरी, प्रशांत पोतदार , अन्न पुरवठा व औषध निरीक्षक जाधव , पीएसआय विनोद भालेराव, पोलीस कर्मचारी सपकाळ, चव्हाण, काबलीये यांनी पार पाडली. पुढील तपास पीएसआय बोडखे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!