Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : गांजा प्रकरणातील खरेदीदार नगर जिल्ह्यातून अटक

Spread the love

औरंगाबाद – उस्मानपुरा पोलिसांनी ४०किलो गांजा मागवणार्‍या रेकाॅर्डवरच्या आरोपीला नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बर्‍हाणपुरातून अटक करुन आणले.सहा महिन्यांपूर्वीच गांजा खरेदी प्रकरणात त्याला बीड ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती.५वर्ष शिक्षा भोगून तो आलेला आहे. दिनकर त्रिंबक तुपे(४५अंदाजे)रा.बर्‍हाणपुर असे अटक आरोपीचे नाव आहे.त्याला कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दिनांक ८ आॅक्टोबर रोजी सकाळी ९वा.पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांनी सापळा रचंत विशाखापट्टणम येथून येणार्‍या गोविंदा मनी आरली(३८) लाऊ अम्मा राऊ आरली(४०) मन्नया अप्पाराव पिल्ले यांना अटक केली होती. २लाख ७३हजारांचा हा गांजा नेवासा तालुक्यातील बर्‍हाणपुरच्या दिनकर तुपे ने मागवल्याचे विशाखापट्टणम च्या आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले होते. वरील कारवाई पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहूल सूर्यतळ, पोलिस कर्मचारी योगेश गुप्ता, संदीपान धर्मे यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!