Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : मोर्चाच्या निमित्ताने तणाव निर्माण करणाऱ्या संशयितांची धरपकड

Spread the love

नांदेड : नांदेडमध्ये निघालेल्या मोर्चात दगडफेक करून शहरात तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीच्या या घटनेतील ८३ पैकी ५० आरोपींना आता पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील वातावरण बिघडू पाहणाऱ्यांवर कारवाई करत असताना पोलिसांनी रजा अकादमीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच व्यासपीठावरुन प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली आहे.

दगडफेकीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेने आज पुकारलेला बंद रद्द करण्यात आला असला तरीही पोलिसांनी सतर्कता बाळगत बंदोबस्त वाढवला असल्याची माहितीही संजय कुमार यांनी दिली आहे. दगडफेक प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आल्याचे संजय कुमार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद उमटले. राज्यातील नांदेड, अमरावती, परभणी या शहरांमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात दगडफेक करण्यात आली. नांदेड येथे काही युवकांनी त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करत दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हे युवक आक्रमक झाले आणि शिवाजीनगर येथील दुकानाची नासधूस करत, व्यपाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. तसेच शिवाजीनगर, बरकत चौक, देगलूर नका या भागात प्रचंड दगडफेक करण्यात आली होती. मुख्य रस्त्यावर वाहन जाळत दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या. यामुळे नांदेड शहरात काही दिवस तणावाचे वातावरण होते. या घटनेत नागरिक आणि पोलीस अधिकारी जखमी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी आता कडक भूमिका घेत आरोपींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!