MaharashtraNewsUpdate : इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ

औरंगाबाद-अमरावतीमधील संचारबंदीमुळे निर्माण झालेल्या अडचणीनंतर तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत २०२१ २२ या शैक्षणिक वर्षांकरिता राज्य सामाईक परीक्षा प्रवेशासाठी तीन मुदतवाढ दिल्याचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी सांगितले.
या मध्ये एम.सी.ए, एम फार्र्मसी , एम. ई , एमटेक,एम- आर्च,बी-आर्च,बी-फार्मसी,बी-एच एमसीटी, डीएसी, एमसीटी,एमबीए, इत्यादी परीक्षांच्या प्रवेशासाठी १७ नोव्हेंबर ही अंतिम दिनांक होती पण आता २२ नोव्हेंबर पर्यन्त मुदतवाढ दिल्याचे जगताप यांनी प्रसिधद केलेल्या पत्रकात म्हटले आहे. अधिक माहितीसाठी www. mahacet.org या संकेत स्थळावर भेट द्यावी.