Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यातील डॉक्टर जागा होतो तेंव्हा… !!

Spread the love

औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानप्रवासादरम्यान घडलेला एक प्रसंग त्यांनी मांडला आहे. विमानप्रवासादरम्यान अत्यवस्थ झालेल्या एका प्रवाशावर तातडीने प्राथमिक उपचार केले. डॉ. भागवत कराड यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाला वेळेत प्राथमिक उपचार मिळाले आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. डॉ. कराड यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतः भागवत कराड यांनी हि माहिती आपल्या फेसबुक पेजवर दिली आहे.

या पोस्टनुसार डॉ. भागवत कराड हे काल इंडिगो फ्लाइट क्रमांक १७१ने दिल्ली ते मुंबई प्रवास करत होते. त्यांची सीट समोर बसलेलल्या एका प्रवाशास अचानक रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आणि तो प्रवासी चक्कर येऊन पडला. ही बाब, डॉ. कराड यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णाजवळ जाऊन तपासणी केली आणि प्राथमिक उपचार सुरु केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्या रुग्णाच्या प्रकृतीतही सुधारणा झाली. विशेष, म्हणजे त्यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्या रुग्णावर उपचार केले.

https://www.facebook.com/BhagwatjiKarad/photos/a.1535252183370203/3237424953152909/

डॉ. भागवत कराड यांनीपाळ्या पोस्टमध्ये म्हटले आहे कि, काल प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइट इंडिगोमध्ये १२ A सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो विमानात अचानक कुजबुज सुरु झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोड सुश्रुषा केली. आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली, असं डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ संतांची हि शिकवण कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या, असं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!