Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : अल्पवयीन विवाहित मुलीवर अनेकांकडून लैंगिक अत्याचार , पोलिसांवरही केला आरोप

Spread the love

बीड : गेल्या सहा महिन्यांत १६ वर्षांच्या विवाहित मुलीवर अनेकांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला असून पीडित मुलीच्या आरोपानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. संतापजनक बाब म्हणजे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार एका पोलिसाने देखील तिचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडिता आता दोन महिन्यांची गरोदर आहे.

पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, “तिच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी आठ महिन्यांपूर्वी तिचे लग्न लावून दिले. मात्र, पती आणि सासरच्या मंडळींनी तिला मारहाण आणि वाईट वागणूक दिली आणि छळ केला. त्यामुळे ती पळून गेली आणि वडिलांकडे राहायला आली. मात्र, वडिलांनी तिला परत न घेतल्याने ती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बसस्थानकावर राहत असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

सदर पीडितेने बालकल्याण समितीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , “माझ्यावर अनेकांनी अत्याचार केले आहेत. अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेकवेळा गेले, परंतु पोलिसांनी दोषींवर कोणतीही कारवाई केली नाही. त्याऐवजी, माझ्यावर एका पोलिसाने अत्याचार केला.”

दरम्यान, पीडितेने या आठवड्यात पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर, बालविवाह प्रतिबंध कायदा, पॉस्को आणि भारतीय दंड संहितेच्या बलात्कार आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रविवारी बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामासामी यांनी या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असल्याचे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!