Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : राहुल गांधी यांचे मोदी सरकार , भाजप आणि संघावर टीकास्त्र

Spread the love

नवी दिल्ली : मोदी सरकारकडे सुरक्षेबाबत कोणतीही रणनीती नसल्याचे काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असून, सीमेवर प्राणाची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण करत आहेत. तर सरकार खोट बोलत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मोदी सरकारकडे कोणतीही रणनीती नाही. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी गुन्हेगारी खेळ केला जात आहे. ते Mr. ५६ इंच घाबरले आहेत. सरकार खोट बोलत आहे. माझ्या संवेदना आपल्या जीवावर खेळून सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत आहेत’, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले.

भाजप-आरएसएसने भारतात द्वेष पसरवला…

दरम्यान राहुल गांधी यांनी आज पक्षाच्या डिजीटल ‘जन जागरण अभियाना’चे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदूत्व या संकल्पना वेगवेगळ्या असल्याचे मत मांडले. ते म्हणाले कि , आज लोक हिंदू धर्म आणि हिंदुत्वाला एकच समजू लागले आहेत. मात्र, वास्तवात या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही हिंदू असाल तर तुम्हाला हिंदुत्वाची काय गरज? भाजप-आरएसएसने भारतात द्वेष पसरवला आहे. आमची विचारधारा ही प्रेम आणि बंधुभावाची आहे.

यावेळी बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारतात दोन विचारधारा आहेत, एक काँग्रेस पक्षाची आणि एक आरएसएसची विचारधारा. आजच्या भारतात भाजप-आरएसएसने द्वेष पसरवला आहे आणि एकता, बंधुता आणि प्रेमाची काँग्रेसची विचारधारा भाजपच्या द्वेषी विचारसरणीने झाकोळली आहे, हे मान्य करावेच लागेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!