Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : अमृता फडणवीस नवाब मलिक यांच्या ट्विटवर भडकल्या , पाठवली नोटीस

Spread the love

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाची गंभीर दाखल घेऊन फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या पतीच्या बचावासाठी पुढे आल्या असून त्यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आशीर्वादाने राज्यात ड्रग्जचा उद्योग चालत होता, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी एक फोटो प्रसिद्ध केला होता. त्या फोटोत देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यासोबत जयदीप राणा हा ड्रग पेडलर असल्याचे मलिक यांनी म्हटले होते. याच आरोपासंदर्भात अमृता फडणवीस यांनी ही नोटीस पाठवली आहे.

दरम्यान अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्यांच्या अल्बमसाठी जयदीप राणा यानेच फायनान्स केला होता, असा दावा मलिक यांनी केला होता. मलिक यांच्या या आरोपानंतर आता अमृता फडणवीस यांनी ही नोटीस धाडली आहे. नवाब मलिक यांनी पुढील ४८ तासांमध्ये त्यांनी केलेले मानहानीकारक आणि दिशाभूल करणारे ट्विट डिलीट करावे आणि जाहीरपणे माफी मागणी असे आवाहन अमृता फडणवीस यांनी मलिक यांना केले आहे. मात्र मलिक यांनी जर असे केले नाही, तर मात्र आपल्याला मानहानीच्या खटल्याला सामोरे जावे लागेल असा इशाराही फडणवीस यांनी मलिकांना दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, ‘ नवाब मलिक यांनी काही चित्रांसह बदनामीकारक, दिशाभूल करणारी आणि अपमानास्पद ट्विटची मालिकाच शेअर केली आहे! आयपीसीच्या विविध कलमांखाली फौजदारी कारवाईसह बदनामीची नोटीस येथे आहे. एकतर बिनशर्त सार्वजनिक माफी मागून ४८ तासांत ट्वीट हटवा किंवा कारवाईला सामोरे जा!’

Click to listen highlighted text!