Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationUpdate : बारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या , परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजेच इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठीचे अर्ज दाखल करण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उद्यापासून म्हणजेच १२ नोव्हेंबरपासून परीक्षेसेसाठीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

यासाठी विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन पद्धतीनं अर्ज दाखल करावे लागणार आहेत. याबाबतचं एक ट्विट देखील वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२१ या कालावधीत भरायचे आहेत, असे पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!