Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ९९७ नव्या रुग्णांची नोंद तर २८ रुग्णांचा मृत्यू

Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात आकडेवारी नुसार राज्यात आज कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या किंचित घटली असली तरी मृत्यूच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ९९७ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या १ हजार ०९४ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण १ हजार ०१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या १ हजार ९७६ इतकी होती. तर, आजही २८ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या १७ इतकी होती.

दरम्यान आज राज्यात झालेल्या २८ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ६४ हजार ९४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के इतके आहे. आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ३५२ इतकी आहे. काल ही संख्या १२ हजार ४१० या बरोबरच राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा विचार करता सर्वात जास्त रुग्णवाढ आज मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे. मुंबईत एकूण २७६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्या खालोखाल पुणे मनपा क्षेत्रात आज ७७ नवे रुग्ण वाढले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात ही संख्या ९८ इतकी आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण २७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात ३४, कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात २९, मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात १९ पनवेल मनपा क्षेत्रात ३२, वसई विरार मनपा क्षेत्रात १७ आणि रायगडमध्ये ही संख्या ९ इतकी आहे.नाशिक मनपा क्षेत्रात १९, सोलापूर मनपा क्षेत्रात २, साताऱ्यात ही संख्या २५, कोल्हापूर मनपा क्षेत्रात २, सांगलीत ३, रत्नागिरीत ३, तर सिंधुदुर्गात १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच औरंगाबाद मनपा क्षेत्रात ७ नवे रुग्ण आढळले असून परभणीत मनपा क्षेत्रात २ रुग्ण आढळले आहेत. तर, उस्मानाबादमध्ये २०, बीडमध्ये १२ रुग्ण आढळले आहेत. नागपूर मनपाक्षेत्रात ३ रुग्ण आढळले आहेत. १,१०,२६४ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ३६ लाख ३० हजार ६३२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख २१ हजार ४२० (१०.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १० हजार २६४ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. तर, ८७६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!