MaharashtraNewsUpdate : राज्य सेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Spread the love
मुंबई : कोरोनाच्या काळात स्थगित करण्यात आलेल्या एमपीएससीच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची संधी हुकल्याची दखल राज्य सरकरने घेतली आहे. या निर्णयानुसार एमपीएससीच्या परीक्षार्थींना आता परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.