AurangabadCrimeUpdate : आईचा फोन घेऊ देत नव्हता म्हणून काढले डोळे, केले ८० ते ९० वार…!!

औरंगाबाद – आईने मोबाईलवर केलेला काॅल उचलू न देता हातातून मोबाईल हिसकावून घेतल्यामुळे संतप्त झालेल्या दारुच्या नशेतील गुन्हेगाराने बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास मोबाईल हिसकवणार्या रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराचे चाकूने डोळे काढून टाकले व ८० ते ९० वार करुन घरी येऊन झोपला. या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.तर खुनाचा तपास जिन्सी पोलिसांनी लावून आरोपी सिडको औद्योगिक पोलिसांकडे सोपवला आहे.
अबुबकर हादी चाऊस (४२) रा.कटकटगेट असे मयताचे नाव आहे.तो रेकाॅर्डवरचा गुन्हेगार होता. त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न करणे व अन्य गंभीर गुन्हे सिडको पोलिस ठाण्यात दाखल आहेत.त्याचा मित्र समीर स्टायलो उर्फ सय्यदसमीर शौकत(२५) अल्तमश काॅलनी व त्यांचा आणखी एक जोडीदार शाकेर अशा तिघांनी चिश्तीया काॅलनी चौकातून मद्य खरेदी करुन आंबेडकरनगरात नेक्सा वाईन शाॅप शेजारी पोहोचले त्या ठिकाणी मद्यपान झाल्यावर समीर स्टायलो च्या आईचा फोन मोबाईलवर येत असतांना मयत अबुबकर याने मोबाईल हिसकावून घेतला.त्यामुळे चिडलेल्या समीरस्टायलो ने अबुबकरचाच चाकू घेत त्याच्यावर ८०ते ९०वार केले.व त्याचे दोन्ही डोळे काढून टाकले.हा प्रकार पाहून त्यांचा तिसरा साथीदार शाकेरने धूम ठोकली.
दरम्यान सिडको औद्योगिक पोलिसांना बुधवारी सकाळी ७वा.या खुनाची माहिती कळाली. पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान खबर्याने जिन्सी पोलिस ठाण्याचे पीएसआय गोकूळ ठाकूर यांना इत्यंभूत घटनाक्रम सांगितला.त्यानुसार आज दुपारी ३वा. समीरस्टायलो ला रोशनगेट भागातून ताब्यात घेतले.त्याला विश्र्वासात घेत विचारपूस केली असता.त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वरील कारवाई पोलिस उपायुक्त दिपक गिर्हे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे,निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोकूळ ठाकूर,पोलिस कर्मचारी संपत राठोड,नंदलाल चव्हाण, सुनिल जाधव,नंदू परदेशी, संतोष बमनात यांनी पार पाडली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको औद्योगिक पोलिस करंत आहेत
तरुणीचा खून, गुन्हा दाखल
औरंगाबाद – राजनगर परिसरातील मोकळ्या मैदानात तरुणीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
इंदू राय(२२) रा.मुकुंदवाडी असे मयत महिलेचे नाव असून एक आठवड्यापूर्वी ती एमआय मोबाईल शोरुम मधे नौकरीला लागली होती.तिचा प्रियकर भोला नामक इसम असून तो फरार असल्याची माहिती पोलिस तपासात उघंड झाली आहे. तसेच मृत इंदूच्या गळ्यावर आवळल्याच्या मयताचा भाऊ राहूल राय याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलिस करंत आहेत.
२४तासात ट्रकसह चोरटा अटकेत.
७ तारखेला मध्यरात्री बायजीपुरा परिसरातून ट्रक चोर २४ तासात जिन्सी पोलिस आणि गुन्हेशाखेने गंगापूरहून ताब्यात घेतला. सलमान अन्सारी शफीक अन्सारी(२३) रा.इंदीरानगर बायजीपुरा असे अटक आरोपीचे नाव आहे.रेकाॅर्डवरच्या चोरट्याच्या मदतीने त्याने ट्रकचोरी केल्याची माहिती अटक आरोपीने पोलिसांना दिली. सी.सी.टि.व्ही.फुटेजच्या मदतीने वरील चोर अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.वरील कारवाई पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोकूळ ठाकूर, दत्ता शेळके यांनी पार पाडली