Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी

Spread the love

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध त्यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप होत असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दोन संघटनांनी केली आहे.

नवाब मलिक यांच्या आरोपानुसार वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र बनवले . मुस्लिम असतानाही मागासवर्गीय प्रवर्गातील जात असल्याचे त्यांनी दाखवले. त्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळवली व मागावर्गीयांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक आपल्या आरोपांवर ठाम असतानाच भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी या दोन संघटनांनी आता समीर वानखेडे यांच्या विरोधात मुंबई शहर जिल्हा जातपडताळणी समितीकडे वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल केली आहे.

या अर्जाद्वारे ‘समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीचा खोटा व चुकीचा दाखला मिळवून त्या आधारावर सरकारी नोकरी मिळवली असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. याबाबत चौकशी करण्यात यावी व पडताळणीत वानखेडे यांचा दाखला खोटा असल्याचे स्पष्ट झाल्यास तो रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी या संघटनांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान समीर वानखेडे हे दलित आहेत की मुस्लिम आहेत, यावरून हा वाद सुरू आहे. मात्र, याबाबतचे सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळलेले आहेत. वानखेडे यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडेही आपली कागदपत्रे सादर केलेली आहेत. त्याआधी मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी मुंबईत वानखेडे कुटुंबाची भेट घेतली होती व वानखेडे यांचे समर्थन केले होते.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!