Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पोटगीची रक्कम हडपणारा भामटा, सायबर पोलिसांकडून अटक

Spread the love

औरंगाबाद : विवाहितेला पतीकडून मिळालेली पोटगीची रक्कम हडपणार्‍या भामट्या ला सायबर पोलिसांनी दिल्लीहून ११ महिन्यांनंतर अटक करुन आणले. आशिषकुमार भगवानदिप मौर्य (२१) रा.ढेबरिया राऊत जि.बस्ती हल्ली मु.पश्चिम दिल्ली.पोलिसांना पाहून पळून जाणार्‍या या भामट्याला दोन कि. पाठलागकरुन अटक केली.

आरोपी मौर्यने फैसबूकद्वारे शहरातील एका महिलेशी ओळंख वाढवली तिला जर्मनीहून बोलतोय असे भासवंत एक आंतरराष्ट्रीय नंबर दिला. व पिडीत महिलेला महागडे गिफ्ट पाठवतो असे म्हणंत बोगंस कुरिअर पाठवले व २१ लाख रु. उकळले. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुढे हा गुन्हा पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या आदेशाने सायबर पोलिसांकडे वर्ग केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी गुन्ह्याचे  तांत्रिक विश्लेषण करंत आरोपी मौर्यचा माग काढला.तो पश्चिम  दिल्लीतील ज्वालापुरी नागलोई भागात असल्याचे कळले.

या प्रकरणात दिल्ली पोलिसांची मदंत घेत एपीआय सातोदकर यांनी २ कि.मी.पाठलाग करुन आरोपी मौर्यला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक मोबाईल, दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे ४० एटीएम,२६ पासबूक, ७४ चेकबुक, चार वह्या, आरोपी मौर्य विदेशातील साथीदारासह नियोजनबध्द कट रचून अनेक नागरिकांना फसवंत असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले. वरील कारवाई पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय गौतम पातारे, एपीआय अमोल देशमुख,पीएसआय राहूल चव्हाण, पीएसआय वारे, सविता तांबे,पोलिस कर्मचारी गोकुळ कुत्तरवाडे,रवी पोळ, अमोल सोनटक्के यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!