Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#ManmohanSingh | डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर

Spread the love

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना एम्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना १३ ऑक्टोंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच त्यांना ताप असल्यामुळे तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, ती सुधारत असल्यामुळे रविवारी त्यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान , काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती खालावल्याची तसेच त्यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, त्यांची प्रकृती उत्तम असून, कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले होते. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यादरम्यान फोटो काढण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ते माझे आई-वडील आहे, म्युझियममधील प्राणी नाही, या शब्दांत डॉ. मनमोहन सिंग यांची कन्या दमन सिंग यांनी मांडवीय यांच्यावर टीका केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!