Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadPoliticalUpdate : गुंठेवारी प्रश्नावर दरेकरांची महाविकास आघाडीवर टिका

Spread the love

औरंगाबाद : शहरातील गुंठेवारी प्रश्नावर सरकारला वसुलीच करायची असेल तर एखादा सचिन वाझे पाठवा.शासनाच्या आदेशाने मनपा आयुक्त करंत असलेला मस्तवाल पणा शहरातील कष्टकर्‍यांना त्रासदायक ठरतो.यासाठी भाजपा रस्त्यावर उतरणारअसे उद्गार विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत काढले.

शहर भाजपाच्या वतीने पोलिसआयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांना पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर गुंठेवारी प्रश्नावर सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे  गुन्हे दाखल करा अशा आशयाचे निवेदन दिले होते.पण गुन्हे दाखल होणार नसतील तर या संदर्भात आम्ही न्यायालयीन लढाई लढू असे स्पष्टीकरण दरेकरांनी दिले.  नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरणार असल्याचे दरेकरांनी सांगितले.

मी एसटी कर्मचार्‍याचा मुलगा

एस.टी.कर्मचार्‍यांच्या बाबतीत सरकारने वेळकाढू भूमीका घेतली आहे.मी स्वता:एका एसटी कंडक्टरचा मुलगा असल्यामुळे त्यांचे प्रश्न, अडचणी मी चांगल्या रितीने समजू शकतो व सोडवण्याचा प्रयत्न करणार असे दरेकर म्हणाले. जर शासनाने कर्मचार्‍यांना पाठवलेल्या नोटीसा मागे घेतल्या नाहीत तर महामंडळाच्या एम.डीच्यादालनाला आपण स्वता:ताळे ठोकू असा इशाराही दरेकरांनी दिला. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांचाही चांगलाच समाचार घेतला. या पत्रकार परिषदेला, शहराध्यक्ष संजय केणेकर, राजू शिंदे, बापू घडामोडे, यांची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!