AurangabadCrimeUpdate : व्वा रे पठ्या …. लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रेयसीचे घर फोडले !!

औरंगाबाद : लग्नाच्या तगाद्यापासून सुटण्यासाठी मजूराने प्रेयसीचे घरफोडून ५५ हजारांचा ऐवज लांबवत सुटका करुन घेण्याचा प्रयत्न जिन्सी पोलिसांनी हाणून पाडला व आरोपीला अटक केली.सिकंदरखान अकबरखान(३६) रा.निजामगंज काॅलनी धंदा मजूरी असे अटक आरोपीचे नाव आहे.
लिव्हइन रिलेशनशिप मधे सिकंदरखान विवाहित आहे.तरीही बायजीपुर्यामधील महिलेसोबंत तो लिव्हईन मधे गेल्या अनेक महिन्यापासून राहात होता.त्यामुळे त्याची प्रेयसी सतत लग्न कर म्हणून आग्रह करंत होती.पण तो विवाहित असल्यामुळे लग्नास तयार होत नव्हता. शेवटी २२आक्टोबर रोजी सिकंदरखानची प्रेयसी माहेरी गेली असता सिखंदरखान ने घराचा कडीकोंडा तोडून ६हजार५००रु.रौख व ५०हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले.या प्रकरणी २३आॅक्टोबर रौजी गुन्हा दाखल झाल्यानंतर एका आठवड्यात सिकंदरखानला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोकूळ ठाकूर करंत आहेत.
३लाख ६३हजार लांबवले
काल २८आॅक्टोबर रोजी जाफरगेट परिसरातील जैनपेट्रोलपंपावर मालकासोबंत दुचाकीवर उभ्या असलेल्या नागरिकाचे ३लाख ६३हजार रु. असलेली बॅग दोन चोरट्यांनी लांबवली.ही घटना सी.सी.टिव्ही.फुटेजमधे कैद झाली आहे. या प्रकरणी आज पहाटे ५च्या सुमारास जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पवार करंत आहेत.