Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : डाॅक्टरच्या सर्तकतेमुळे नवर्‍या विरुध्द बलात्काराचा गुन्हा

Spread the love

औरंगाबाद – मुंबईतील मानखूर्द येथील रुग्णालयात १४वर्षाची अल्पवयीन मुलगी बाळंतपणासाठी दाखल होताच रुग्णालयातील सर्तक डाॅक्टरांनी मानखूर्द पोलिसांना कळवले. सरकारतर्फे महिला पोलिस कर्मचार्‍याच्या तक्रारीवरुन मानखूर्द पोलिस ठाण्यात बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल झाला. आरोपी औरंगाबाद गारखेडा परिसरातील असल्यामुळे जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग होऊन आला आहे.

या प्रकरणी अल्पवयीन पिडीतेचा नवरा आकाश गवळी(२२) रा.धंदा मजूरी, सासरा चर्तूभूज गवळी,(४५)सासू रेखा गवळी,(४२) सर्व रा.इंदीरानगर गारखेडा,तसेच पिडीत मुलीची आई कमल नवगिरे पैठण,व मीरा सूर्यवंशी चेंबूर अशा पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. एप्रिल २०२०मधे लग्न ठरवून जुलै २०मधे पैठण शहरात अल्पवयीन पिडीतेच्या पालकांनी व आरोपी च्या पालकांनी संगणमताने आकाशशी लग्न लावून दिले. या प्रकरणी आरसीएफ पोलिस ठाण्यात वरील पाच आरोपींविरुध्द २५आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला.त्यानंतर हा गुन्हा शनिवारी शहरातील जवाहरनगर पोलिस ठाण्यात वर्ग झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चौधरी करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!