Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीबाबत मालिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Spread the love

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांनी एनसीबीचे विभागीय संचालक यांच्यावरील आरोपांचा धडाका आजही सुरूच ठेवत त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात यावी यासाठी मलिक यांनी या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी वर्षभरातील राज्यातील विविध घटनाक्रमांसह एनसीबीच्या कारवायांबाबत आपण मुख्यमंत्र्यांबरोबरच पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार असल्याचे सांगितले आहे.

आज सकाळी पत्रकार परिषदेत या बाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले कि, “मी दोन दिवस परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर असताना, ज्या काही घडामोडी या क्रुझ ड्रग्ज केसमध्ये झालेल्या आहेत. एका पंचाने प्रतिज्ञापत्राच्या माध्यामातून जो सगळा प्रकार समोर आणलेला आहे, हे धक्कादायक आहे. मी जे आरोप करत होतो, त्यात कुठे तरी भर देणारा हा प्रकार आहे. ज्याप्रकारे मी अगोदरच जाहीर केले होते की, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे.

आज दोघांना भेटून या प्रकरणी एसआयटी चौकशीच्याबाबत मी त्यांच्याशी बोललो. गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी सांगितले  की,  या प्रकरणात बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या आहेत. पोलीस विभाग त्याचा तपास करत आहे. तपास करून निश्चितरूपाने यामध्ये गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई होईल, असे मला आश्वासन देण्यात आलेलं आहे. ” तसेच, “मला अपेक्षा आहे की एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर गोसावी सारखे लोक कसे पैस उकळत आहेत? किंवा कशाप्रकारे ते लोक इतरांना हाताळत आहेत. याबाबतचं सगळं सत्य तपासातून बाहेर येईल. मला वाटतं एकदा एफआयआर दाखल झाल्यानंतर हळूहळू तपास पुढे जाईल.” असंही मलिक म्हणाले.

कोऱ्या कागदावर घेतल्या सह्या …

याचबरोबर, “एफआयआर हा घटनेबाबत होणार आहे, म्हणजे खंडणी वसूल करणे, जे लोक पंच आहे हे फरार असताना आरोपीला हाताळत आहेत. असे देखील सांगण्यात आले आहे की कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतली. याबाबत सगळा तपास करून कुठला एफआयआर नोंदवायचा हे पोलीस ठरवतील. एफआयआर व्यक्तीच्या विरोधात नाही तर घटना जी आहे त्याबाबत एफआयआर होईल. तपासातून जे जबाबदार असतील, त्यांच्यावर या गुन्ह्याबाबत पोलिसांकडून सत्यता तपासून कारवाई केली जाईल. कुणाला सूडबुद्धीने अडकवायचे अशी भूमिका नाही. पण पंचाचे जे प्रतिज्ञापत्र आहे. त्यामधून बरचसे काही समोर आलेले आहे. निश्चितपणे त्याचा तपास होईल.” असा विश्वासही नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्रीही पंतप्रधानांना लिहिणार पत्…

दरम्यान नवाब मलिक यांनी बॉलीवूडवर लाखो लोकांचा रोजगार आहे, ते जर बदनाम झाले तर देशाचेही नुकसान होईल अशी भीती व्यक्त करून म्हटले आहे कि , गंभीर विषय आहे, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सांगितले की, आपल्याला तपासून पुढे कसे जायचे आहे. याबाबत ते निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी मी बोलत असताना त्यांनी एक चिंता व्यक्त केली, बॉलीवूड ही हॉलीवूडनंतरची जगातली एक मोठी इंडस्ट्री आहे. लाखो लोकांचा त्यावर रोजगार आहे. बॉलीवूड या देशातील संस्कृती जगभर पोहचवत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये या इंडस्ट्रीचा तीन-चार टक्के वाटा आहे. जर या पद्धतीने या इंडस्ट्रीला बदनाम करण्याचे काम झाले तर, याचा परिणाम केवळ यामधील काही अभिनेत्यांवर होणार नाही.

लाखो लोकांचा रोजागार यावर आहे. देशाची संस्कृती पुढे जात आहे आणि ही जर बदनाम झाली, मुंबई बदनाम झाली तर हे देशाचे देखील नुकसान आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की , याबाबत मी पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे. जे काही घटनाक्रम महाराष्ट्रात वर्षभरापासून सुरू आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री स्वतः इंडस्ट्रीच्याबाबत त्यांनी जी चिंता दर्शवलेली आहे, ते पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवतील.” अशी माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!