Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LiveUpdate | आजही आर्यन खान प्रकरणाची सुनावणी अपूर्णच

Live update

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 


 • आजही आर्यन खान प्रकरणाची सुनावणी अपूर्णच. उद्या दुपारपर्यंत सुनावणी तहकूब

 • वैद्यकीय तपासणी केली तरी मुनमून धामेचा विरोधात काहीच पुरावा मिळणार नाही; वकिलांचा युक्तिवाद

 • एनसीबीच्या थिअरीप्रमाणे या प्रकरणात प्रत्येक जण स्वतंत्रपणे क्रूझवर गेला. त्यामुळे कट शिजल्याचा आरोप चुकीचा आहे. तसेच एनसीबीने आरोपींना फौजदारी दंड संहितेच्या ४१ (अ) खाली आगाऊ नोटीसही द्यायला हवी होती जेणेकरून त्यांच्याकडून तपासात सहकार्य मिळाले असते. सात वर्षे शिक्षा असलेल्या प्रकरणांत आरोपीला अशी नोटीस देणे आवश्यक असल्याचे सुप्रीम कोर्टाने अनेक निवाड्यांत स्पष्ट केलेले आहे. एनडीपीएस कायद्याखालील प्रकरणांत फौजदारी दंडसंहितेच्या (सीआरपीसी) कलम ४१ (अ) अन्वये आरोपीला आगाऊ नोटीस देणे लागू होते का? या प्रश्नावर उत्तर देताना आंध्रप्रदेश कोर्टाने स्पष्ट केले आहे की, एनडीपीएसच्या २० (बी) व अन्य कलमाखाली कमाल सात वर्षे शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांत ४१ (अ) लागू होते. हा मुद्दा लक्षात घेऊन पहिल्या तीन आरोपींच्या अटकेचा घटनाक्रम लक्षात घ्यावा. त्यावेळी एनसीबीने त्या तिघांवर कटाचे कलम लावलेच नव्हते. कट करस्थानाच्या आरोपाखाली तिघांना अटक दाखवण्यातच आलेली नाही. अटकेच्या वेळी अमलीपदार्थ बाळगणे आणि सेवन एवढ्याच आरोपाखाली कलमे लावली होती, हे त्यांचा अटक पंचनामा पाहिल्यानंतर स्पष्ट होते. एनसीबीने नंतर त्यांना कोर्टात हजर करून कोठडी मिळवताना कलम २८, २९ ही कट करस्थानाची कलमे लावली आहे. एनसीबीच्या दाव्याप्रमाणे, अरबाज मर्चंटने जबाबात चरस बाळगल्याचे मान्य केले आणि आर्यनसोबत सेवन करण्यासाठी जात होतो, असेही मान्य केले. पण त्या जबाबाविषयी त्यानं माघार घेतली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या तुफान सिंह निवाड्याप्रमाणे एनसीबी अधिकाऱ्यासमोर दिलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. शिवाय त्या जबाबातही केवळ अमलीपदार्थ सेवनाविषयी कबुली आहे. त्यामुळे केवळ तेवढेच कलम लागू होते. कट करस्थानाचा भागच नाही असे हि अमित देसाई म्हणाले.

 • रेव्ह पार्टीमध्ये सेवन करताना एनसीबी आरोपींना पकडते आणि नंतर त्यांची त्वरित रक्त तपासणी केली जाते. मात्र, या प्रकरणात एनसीबीने ते केलेले नाही. एनसीबीने मांडलेल्या कट करस्थानाच्या थिअरीमध्ये आरोपी असलेल्या याच प्रकरणातील दोघांना काल एनडीपीएस कोर्टानेही जामीन मंजूर केला. क्रूझ परत आल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी एनसीबीने त्यांना सेवनाच्या आरोपाखाली अटक केली होती – अमित देसाई

 • आर्यनची बाजू मांडणारे सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी, अरबाझ मर्चंटची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि एनसीबीची बाजू मांडणारे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग कोर्टात दाखल झाले आहेत. आरोपी अरबाज मर्चंटच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांचा पुढील युक्तिवाद सुरू.

 • मुंबईतील क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात. आर्यन खानसह तीन आरोपींच्या जामिनावर निर्णय येण्याची शक्यता आर्यनच्या वकिलांनी युक्तिवाद कालच पूर्ण केलाय. अरबाझ मर्चंट व मुनमून धामेचा यांच्या वतीने आज युक्तिवाद. आर्यनसह तिन्ही आरोपींच्या जामिनाला एनसीबीचा तीव्र विरोध आहे.

 • आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीला सुरुवात

 • समीर वानखेडे एनसीबी कार्यालयात पोहोचले असून 5 जणांच्या समितीसमोर चौकशी होणार आहे.

 • माझ्यावर खालच्या पातळीवर आरोप केले जात आहे हे ‘सर्व आरोप चुकीचे असून, वेळेवर नक्की उत्तर देईन – वानखेडे

● Sameer Wankhede’s Father Dnyandev Wankhede – Press Conferences

समीर वानखेडेंच्या वडिलांचा गंभीर आरोप… ‘माझ्या मुलाची बदनामी करण्याचा प्रयत्न’ मौलवी खोटं बोलत आहेत…

● Recorded | Nawab Malik Press conferences

पेगॅसस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी सुप्रमी कोर्टाचा मोठा निर्णय

पेगॅसस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी सुप्रमी कोर्टाचा मोठा निर्णय

 • राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक दुपारी 3.30 वाजता होणार बैठक

 • ‘जलयुक्त शिवार’ला जलसंधारण विभागाची क्लीन चिट ‘जलयुक्त शिवार अभियानामुळे भूजल पातळीत वाढ’ झाली आहे. राज्याच्या जलसंधारण विभागाने सर्व आक्षेप फेटाळले.

 • मालन गाव (धारवखेड), कुल्लू | आज पहाटे साडेतीन वाजता लागलेली आग आटोक्यात; 12 ते 15 घरे पूर्णपणे जळाली आणि 1 जखमी. पीडित कुटुंबांना मदत वस्तूंचे वाटप केले जाईल: हिमाचल प्रदेश-राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्र

 • तामिळनाडूतील कालाकुरिची जिल्ह्यात फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, 5 जणांचा होरपळून मृत्यू, 9 जणांची प्रकृती गंभीर

 • 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान नागपूर- मुंबई, नागपूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या 12 ट्रेन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बडनेरा-भुसावळ दरम्यान इन्फ्रास्ट्रक्चर कामामुळे नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे मार्गावर 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान अनेक गाड्या रद्द तर नागपूर-अहमदाबाद 01137 या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

 • पाकिस्तानचा सलग दुसरा विजय, न्यूझीलंडचा केला पराभव, तर दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर विजय

आपलं सरकार

Click to listen highlighted text!