Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : GoodNews : मुंबई, पुणे एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही !!

Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात १ हजार ३७० रूग्ण करोनामधून बरे झाले असून, १ हजार २०१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याचबरोबर ३२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरल्यात जमा आहे. कारण, दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. दरम्यान मुंबई, पुणे या सारख्या शहरांमध्ये तर दिवसभरात एकही नवीन कोरोनाबाधित आढळून न आल्याचेही समोर आलेले आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३८,३९५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४८ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०५,०५१ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४००६० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२०,८०,२०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०५,०५१(१०.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७६,१९१ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर ९६१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण २२,९८१ सक्रिय रुग्ण आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!