Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : शहर पोलिसांकडून ३ गुन्ह्यांची उकल ६ अटक, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

औरंगाबाद : पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी गुन्हे शाखेची चांगली टीम उभी केल्यानंतर शहर पोलिसांनाही गुन्हे उघडकीस यश आले आहे. पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अविनाश आघाव पीएसआय दत्ता शेळके, अमोल म्हस्के,यांच्या पथकाने दोन खुनाचे गुन्हे उघडकीस आणले. त्यानंतर लागोपाठ झोन क्र.२ मधील सिडको औद्योगिक पोलिसांनी बीड मधील जवाहरकाॅलनीतून दोन मंगळसूत्र चोरांना ४ लाख ६५ हजारांच्या मुद्देमालासह अटक केली.

 

या चोरट्यांनी पुण्यातील हडपसर आणि स्वारगेट परिसरात मंगळसूत्र चोर्‍या केल्याचे तपासात उघंड झाले. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील दत्तात्रेय गात(२१)व जितेंद्र माने(२५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यापैकी जितेंद्र माने हा रेकाॅर्डवरचा चोरटा आहे.वरील चोरट्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोटरसायकल चोरुन औरंगाबाद, पुणे परिसरात मंगळसूत्र चोर्‍या केल्या. मोटरसायकल चोरीचा गुन्हा पार्थडी पोलिस ठाण्यात दाखल आहे.पोलिसउपायुक्त दिपक गिर्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विठ्ठल पो टे आणि पीएसआय नागरे यांच्या पथकाने वरील कारवाई पार पाडली. तर झोन क्र१मधील सिटीचौक व वाळूज औद्योगिक पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणत ५० हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला.

याशिवाय सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पानदरिबा येथे दोन आठवड्यांपूर्वी मोबाईलचे दुकान फोडणार्‍या चोरट्याला १९ हजारांच्या मुद्देमालासह अटक केली. या प्रकरणात समीर जमीलखान(२४) रा.मिटमिटा याला अठक करण्यात आली. तसेच वाळूज औद्योगिक पोलिसांनी २४तासात जबरी चोर्‍या करणारे दोन चोरटे अटक केले. सलमान आरिफ शेख (२०) रा.रांजणगाव, राहूल अशोक धोत्रे(२४) रा.बजाजनगर या दोघांना वाळूज औद्योगिक पोलिसांनी अटक केल्यानंतर २१आॅक्टोबर रोजी केलेली मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.

या गुन्ह्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून वाळूजऔद्योगिक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसउपायुक्त उज्वला वानकर यांच्या आदेशाने नाकाबंदी करुन संशयितांची अंगझडती घेत आरोपींना अटक केली. या कारवाईत सहाय्यक पोलिसआयुक्त विवेक सराफ,पोलिस निरीक्षक संदीप गुरमे,पीएसआय चेतन ओगले यांच्या पथकाने पार पाडली.

Click to listen highlighted text!