Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात १ हजार ४८५ नवीन कोरोना रुग्ण , सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट

Spread the love

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्याप्रमाणावर घट झाली असून कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. तर कोरोनाबाधित रूग्णांच्या  दररोजच्या मृत्यूची संख्याही घटली आहे. दरम्यान आज २ हजार ०७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख २१ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४ टक्के एवढे झाले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात १ हजार ४८५ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे. राज्यात आज रोजी एकूण २८ हजार ००८ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ९३ हजार १८२ झाली आहे. तर २७ कोरोना बाधित रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,११,१६,३५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९३,१८२(१०.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०८,६१३ व्यक्ती गृह विलगीकरणात असून ९६१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यात कोरोना संसर्गदर दोन टक्क्यांपेक्षा कमी

राज्यातील नगर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अधिक असून  विदर्भ, मराठवाडय़ातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.  सध्या राज्यातील संसर्ग दर दोन टक्क्यांपेक्षा कमी असून ही दिलासादायक बाब असल्याचे आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. दरम्यान आतापर्यंत जवळपास ६८ टक्के नागरिकांना पहिली मात्रा तर ३२ टक्के व्यक्तींना दोन्ही मात्रा दिल्या गेल्या आहेत. मुंबई, पुणे, भंडारा, रायगड अशा काही जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!