Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VidarbhaNewsUpdate : संघ स्थापना दिनानिमित्त काय बोलले सरसंघचालक मोहन भागवत ?

Spread the love

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्ताने नागपुरात संघाच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रम पार पडला. यावेळी  संघाचे प्रमुख प्रमुख मोहन भागवत यांनी  संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित केले . यानिमित्ताने त्यांनी विविध मुद्यांना स्पर्श करीत अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त केले. प्रारंभी  भागवत यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक दिवंगत गोळवलकर गुरुजी यांना वाहिली आदरांजली अर्पण केली.  रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला दोनशे स्वयंसेवकांच्या उपस्थितीत झाला. या भाषणाच्या आधी संघाच्या द्वाजाचे ध्वजारोहण , शारीरिक कवायती झाल्या. प्रास्ताविक महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले. 

कार्यक्रमाला विदर्भ प्रांत संचालक राम हरकरे, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे, इस्रायलचे कौन्सिलेट जनरल कोब्बी शोशनी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांची उपस्थिती होती.

आपला समाज भेदरहित आणि समताधिष्ठित असण्याची गरज

या निमित्ताने संघ कार्यकर्त्यांना संबोधित करताना भागवत म्हणाले की, आजही देशाच्या विभाजनाची वेदना आमच्या मनातून संपलेली नाही. आपल्याला त्या दुःखद इतिहासाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. ज्यामुळे देशाचे विभाजन झाले, त्याची पुनरावृत्ती होऊ नये. म्हणूनच हरवलेल्यांना परत स्वीकारण्यासाठी आपल्याला जुना इतिहास माहित असणे आवश्यक आहे. परंतु अशा अखंडतेची पहिली अट म्हणजे भेदभाव आणि समानता नसलेला समाज. या उणिवांमुळे काही रानटी परदेशी आले आणि आम्हाला पदच्युत करून निघून गेले. आमच्या कमतरतेमुळे हे घडले आहे. भारतीय परंपरेवर व मूल्यांवर आक्रमण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही लोक एकत्रही आले आहेत. भारताचा इतिहास, परंपरेची खिल्ली उडवणं, भारतीयांच्या मनात या रुढीपरंपरांविषयी अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या प्रकारे भारतीय मूल्यांवर हल्ले सुरू आहेत . हिंदू समाज विखुरलेला राहील यासाठी बराच प्रयत्न सुरू आहे. परस्परातील भेद मिटविण्यासाठी समाजाला जोडणाऱ्या भाषेची आज गरज आहे. भारताने गमावलेले अखंडत्व प्राप्त करायला हवे. त्यासाठी आपला समाज भेदरहित आणि समताधिष्ठित असण्याची गरज आहे.

सर्वांसाठी लोकसंख्या कायदा लागू करावा

‘केंद्र सरकारने लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार करत लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायला हवा. धार्मिक आधारावर सुरू असलेल्या असमान प्रजनन दराचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर देशाची संसाधन क्षमता, भविष्यातील आवश्यकता आणि लोकसंख्या असंतुलन पाहता सर्वांसाठी लोकसंख्या कायदा लागू करावा,’ अशी सूचनाही   भागवत यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी  आसाम आणि मिझोराममधील पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून नाराजी व्यक्त केलीय. “एकाच देशात आपल्याच दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरुद्ध युद्ध करतात. गोळीबारात लोक मारले जातात. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत की काय आहोत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. दसऱ्याच्या या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी  देखील हजर आहेत . दोन्ही भारताचेच राज्यं असूनही त्या दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरुद्ध युद्ध करतात. गोळीबारात लोक मारले जातात. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत की काय आहोत? आपल्या राजकीय स्पर्धेतून आता सरकारांमध्येच विरोध होतोय. पक्षांचा विरोध असेल तर चालेल, पण सरकारी व्यवस्था तर एक आहे, संविधानानुसार ही व्यवस्था निर्माण झालीय. संविधानानुसार आपण संघराज्य आहोत.”

सर्व मंदिरे ही भाविकांच्या ताब्यात असायला हवीत

राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील सर्वांनी उत्स्फूर्तपणे योगदान दिले . आपलं काही तरी आपण पुन्हा मिळवलंय ही भावना त्यामागे आहे.  कोरोनाच्या संकटानं देश घाबरलेला नाही. आर्थिक क्षेत्रात पुन्हा तेजी आली आहे असे  दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहिलं पाहिजे. ही लाट येणार नाही अशी आशा करूया. पण त्यासाठी तयार राहूया. संघाने  त्यासाठी तयारी केली आहे. लहान मुले मोबाईलवर काय पाहत आहेत, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काय दाखविले जात आहे, यावर विचार करण्याची गरज आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म, बिटकॉईन, अमली पदार्थांचे वाढलेला वापर यावर कुणाचेही नियंत्रण दिसून येत नाहीये. सर्व स्तरातील लोकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. याला सीमापार असलेले देश प्रोत्साहन देत आहेत. पक्ष एकमेकांविरुद्ध असतील तर ठीक आहे. पण सरकारं देखील एकमेकांच्या विरोधात उभी दिसताहेत. हे चित्र बदलायला हवे. दरम्यान देशभरातील काही मंदिरे ही सरकारच्या ताब्यात आहेत. काही भाविकांच्या अधीन आहेत. परंतु, काही ठिकाणी हिंदूंची मंदिरे हडपण्याचे प्रकार दिसून येत आहेत. हिंदू धर्माविरुद्ध कार्य करण्याची स्थळे बनली आहेत. तेव्हा सर्व मंदिरे ही भाविकांच्या ताब्यात असायला हवी. त्याचे व्यवस्थापन भाविकांनी करायला हवे, असे भागवत म्हणाले.

कोरोना लढ्यात आपला देश जगात पुढे

कोरोनाच्या लढ्यात आपला देश जगात सगळ्यात पुढे आहे. सरकार काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतेय. त्यात यश येईलही. पण आपलीही एक जबाबदारी आहे. ती पाळली तर सरकारशिवाय अनेक गोष्टी करता येऊ शकतात . देशात वेगवेगळ्या प्रकारचे अंमलीपदार्थ येताहेत. त्यांचा वापर वाढला आहे. त्यातून येणारा पैसा इतर देश आपल्याविरोधात वापरतात हे स्पष्ट आहे. भारतातील दोन राज्यांचे पोलीस एकमेकांवर गोळ्या चालवतात. आपण एका देशाचे आहोत का, हा प्रश्न अशा वेळी उभा राहतो, असेही भागवत म्हणाले.

वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण हवे

ते म्हणाले कि , पूर्वोत्तर राज्यामध्ये धार्मिक आधारावरील असंतुलित लोकसंख्येमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार या सीमावर्ती राज्यांतील मुस्लिम लोकसंख्येची वृद्धी सरासरीपेक्षा अधिक आहे. याचा फायदा घेत बांगलादेशी घुसखोरी वाढली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) आवश्यकता आहे. संघाने याबाबत रांची येथे २०१५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पारित केला आहे. काही विद्वानांनीदेखील लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे समर्थन केले आहे. केंद्राने एनआरसी अंतर्गत घुसखोरांना नागरिकता आणि जमीन खरेदीच्या अधिकारापासून वंचित करायला हवे.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!