IndiaNewsUpdate : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण : कायदा मंत्र्यांनी भाजपच्या मृत कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

Advertisements
Advertisements
Spread the love

लखीमपूर :  देशभर गाजलेल्या लखीमपूर खेरीमधील हिंसाचार प्रकरण घडून १० दिवस उलटल्यानंतर  १० दिवसांनी  राज्याचे भाजपाचे पहिले वरिष्ठ नेते आणि  कायदामंत्री  ब्रजेश पाठक या भागाला भेट दिली आहे. मात्र, या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांच्या पीडित कुटुंबियांना भेट न देता ज्यांच्यावर शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप होता आणि ज्यांची जमावाने हत्या केली त्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी आणि अटकेत असलेला केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मयत चालकाच्या घरी जाऊन या मंत्री महोदयांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. 

लखीमपूर खेरीमध्ये  शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्यानंतर झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजपचे कार्यकर्ते शुभम मिश्रा आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या चालकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र  ब्रजेश पाठक यांनी लखीमपूर हिंसाचारात मृत्यू झालेल्या ४ जणांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही. ज्यांचा भाजप कार्यकर्त्यांच्या गाडीखाली चिरडून मृत्यू झाला त्यात  शेतकरी नछत्तर सिंग, लवप्रीत सिंग, गुरविंदर सिंग, दिलजीत सिंग, भाजपा कार्यकर्ता श्याम सुंदर निषाद आणि पत्रकार रमन कश्यप यांचा समावेश आहे. गुरविंदर आणि दिलजीत हे शेजारच्या बहरीच जिल्ह्यातील रहिवासी होते.

Advertisements

“त्या ” भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना शस्त्र परवाने देण्याचे आश्वासन

दरम्यान या भेटीच्या वेळी मंत्री ब्रजेश पाठक यांना  विचारले  असता ते म्हणाले, “भाजपा कार्यकर्ता निषाद आणि पत्रकार कश्यप घटना घडली तेथून जवळच राहत होते. त्यामुळे मी परिस्थिती सामान्य झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना भेट देईल. याशिवाय वातावरण निवळल्यानंतर शेतकरी कुटुंबांसोबतही चर्चा केली जाईल. मी या भेटीत भाजपाचे कार्यकर्ते निषाद आणि चालकाच्या पीडित कुटुंबाला या प्रकरणात निष्पक्ष तपासाचे  आश्वासन दिले . तसेच जीवाला धोका असल्यानं त्यांनी शस्त्र परवान्याची मागणी केली आहे . त्यांच्या या मागणी पूर्ण करण्यासाठी लक्ष घालू असं आश्वसन दिले ,” अशी माहिती पाठक यांनी दिली.

Advertisements
Advertisements

“सरकार गुन्हेगारांचे  संरक्षण करीत असल्याचा विरोधकांचा आरोप ”

शेतकरी नेते आणि विरोधी पक्षांनी भाजपा नेत्यांच्या या भेटीवर सडकून टीका केलीय. ही भेट म्हणजे लोकांचं लक्ष्य विचलित करण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं. शेतकरी नेते राकेश टीकैत म्हणाले, “भाजपाच्या मंत्र्यांनी पीडित कुटुंबाला भेटणं घाईचं होईल. ज्या घरातील शेतकऱ्यांची हत्या झालीय त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते. त्यामुळे कुणालाही त्यांना भेटायला जायचं असेल तर आधी त्या कुटुंबाची परवानगी घेणं गरजेचं आहे.”

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू म्हणाले, “सरकारकडून तपासाची दिशा भरकटवण्यासाठी ही भेट घेण्यात आली आहे . हे सरकार गुन्हेगारांचं संरक्षण करत आहे. घटना घडल्यानंतर १० दिवसांनी भेट घेणं म्हणजे त्यांचा पीडितांना न्याय देण्याचा कोणताही हेतू दिसत नाही.” “विरोधी पक्षांच्या दबावानंतर घेतलेली ही भेट भाजपा नेत्यांची केवळ औपचारिकता आहे. सरकारला या घटनेवरून लक्ष्य हटवायचं आहे,” असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी केला.

Leave a Reply

आपलं सरकार