Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : कोरोनामुळे मृत झालेल्या व्यतीच्या कुटुंबियांना दरमहा पाच हजाराची आर्थिक मदत

Spread the love

तिरुअनंतपुरम :  कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना ५० हजाराची मदत देण्याची केंद्र सरकारची तयारी चालू असतानाच केरळचे मुख्यमंत्री पी विजयन सरकारने  कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना दरमहा आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. विजयन सरकारकडून कोविड मृतांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांना दरमहा ५००० रुपयांची मदत दिली जाणार आहे.

ही आर्थिक मदत अगोदरपासून मिळत असलेल्या आर्थिक मदतीपेक्षा वेगळी असेल. म्हणजेच, पीडित कुटुंबांना या अगोदर सरकारकडून दिली जाणारी आर्थिक मदतही उपलब्ध होणार आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी हा लाभ मिळणार आहे.

केरळ सरकारच्या  या निर्णयासंबंधी केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृरित्या या निर्णयाची घोषणा करण्यात आली.  या निर्णयाअंतर्गत ‘कोविड १९ मुळे मृत्युमुखी पडलेल्या आश्रित दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत मिळेल. मात्र या लाभधारकांना  समाज कल्याण, कल्याण कोष किंवा इतर पेन्शन उपलब्ध होणयासाठी अपात्र ठरवले  जाणार नाही. व्यक्तीचा मृत्यू हा राज्यात किंवा राज्याबाहेर किंवा देशाबाहेर झाला असेल तरी राज्याच्या रहिवाशांना हा लाभ मिळेल’, असेही या निर्णयात म्हटले आहे.

अर्जदारांना कार्यालयात बोलावले  जाऊ नये

हा लाभ मिळवण्यासाठी लाभधारकांना एक अर्ज दाखल करावा लागेल. संबंधित जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांना या कामाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. हि मदत  ३० कामकाजी दिवसांच्या आत मिळेल. आश्रित कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसेल याची खातरजमा ग्राम अधिकाऱ्यांना करावी लागेल. निर्णय घेण्यासाठी अर्जदारांना कार्यालयात बोलावले  जाऊ नये, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने  जारी केलेल्या आदेशात म्हटले  आहे. ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ अंतर्गत पुढची तीन वर्ष प्रत्येक महिन्याला ५००० रुपये थेट आश्रितांच्या खात्यात पोहचवली जाईल. जेव्हापर्यंत या योजनेसाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद केली जातो नाही तोवर मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीतून ही आर्थिक मदत दिली जाईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!