CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात १ हजार ७३६ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३ हजार ३३ रूग्ण करोनामधून बरे झाले आहेत. तर, ३६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मार्च नंतर पहिल्यांदाच एवढी कमी संख्या आढळून आली आहे. शिवाय, कोरोनामधून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,०४,३२० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३४ टक्के एवढे झाले आहे.

Advertisements

आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,७९,६०८ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९५७८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Advertisements
Advertisements

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०३,०३,७४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,७९,६०८(१०.९१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३८,४७४ व्यक्ती गृहविलगीकरणात  आहेत तर १,१६३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३२,११५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Leave a Reply

आपलं सरकार