AurangabadCrimeUpdate : प्राध्यापकाच्या निर्घृण खुनामुळे औरंगाबादेत खळबळ, दुसऱ्या खून प्रकरणातील आरोपी गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ५२ वर्षीय इंग्रजीच्या प्राधापकाची राहत्या घरी गळा चिरून व दोन्ही हाताच्या नसा कापून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज पहाटे एन-२ सिडको जवळील ठाकरेनगर भागात असलेल्या संत तुकोबा नगरमध्ये समोर आली आहे.अशी .

Advertisements

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाआहे.आरोपीचा शोध सुरु आहे.अशी माहिती पोलिसउपायुक्त दिपक गिर्‍हे यांनी दिली. बजरंगचौकात तरुणाच्या हत्येची घटना ताजी असताना अवघ्या आठ तासात दुसरी हत्या घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान बजरंगचौक खून प्रकरणातील आरोपी विशाल आगळेही सिडको पोलिसांनी पकडला असल्याचे वृत्त आहे.

Advertisements
Advertisements

राजन हरिभाऊ शिंदे वय-५२, (रा. संत तुकोबा नगर एन-2 सिडको, ठाकरे नगर) असे खून झालेल्या प्राधापकाचे नाव आहे. शिंदे हे शहरातील मौलाना आझाद महाविद्यालायत  इंग्रजीचे प्राधापक म्हणून कार्यरत होते. तर त्यांची पत्नी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत असलेल्या उस्मानाबाद केंद्रात प्राध्यापिका आहेत. ते परिवारासह ठाकरेंनगरात राहतात रविवारी रात्री शिंदे हे  उशिरा घरी आले.व समोरील खोलीत झोपी गेले. सर्व परिवारातिल सदस्य आतील खोलीत झोपी गेले होते.

नेहमीप्रमाणे पहाटे ६ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी झोपेतून उठली. त्यांनी समोरील खोलीत जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.काही वेळातच पोलिसांचे पथक घटनस्थळी दाखल झाले. ही माहिती प्राप्त होताच पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, उप आयुक्त दीपक गिर्हे, गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक टीम ने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृतदेहाची पाहाणी केली असता गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून गळा चिरलेला होता. शिवाय दोन्ही हाताच्या नसा मारेकऱ्यांनी कापल्या होत्या. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविले. दुपार पर्यंत पोलिस  घरात असलेल्या सर्व सदस्यांकडून माहिती गोळा करीत होते. पोलिसांचे विविध पथक   परिसरात असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करीत आहेत.

त्याच दरम्यान पहाटे मुलाच्या कारचा अपघात

सूत्रानुसार शिंदे यांच्या हत्येची माहिती पहाटे समोर आली.त्याच दरम्यान शिंदे यांचा मुलगा चारचाकी कार घेऊन बाहेर पडला होता. त्या कारचा एन-४, जि- सेक्टर येथे अपघात झाला.मुलाने ती अपघातग्रस्त वाहन तेथेच सोडून निघून गेला. साफसफाई करणाऱ्या एका महिलेने हा प्रकार पाहिल्यानंतर त्यास हटकले असता मी रुग्णवाहिका आणण्याससाठी जात असल्याचे सांगत तो तेथून निघून गेला. पोलीसाकडून शिंदे यांच्या मुलाची विचारपूस करण्यात येत आली आहे.पण अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले नाहीत

पोलीस आयुक्तांकडून अनेक तास चौकशी

घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी घटनस्थळी धाव घेतली.सकाळ पासून आयुक्त मर्डर स्पॉटवर ठाण मांडून आहेत.घरातील प्रत्येक व्यक्ती कडून ते वयक्तिक रित्या माहिती घेत आहे. घरात मोजक्याच अधिकारी यांना प्रवेश आहे.इतर कुणालाही प्रवेश नाही. दुपार पर्यंत पोलीस आयुक्त घराच्या आत मधेच होते

मारेकरी जवळीलच असण्याची शक्यता..

शिंदे हे सामाजिक कार्यात अग्रेसर होते.मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांना आपलेसे वाटायचे.त्यांचे कुणाशीही वैर न्हवते.असे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत.  घरातून कुठलीही मौलवण वस्तू  गेलेली नसल्याने ही हत्या  चोरीच्या किंवा लुटपाट च्या उद्देशाने केलेली नसावी असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. शिवाय ही हत्या जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्ती कडून करण्यात अली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

“त्या ” खून प्रकरणातील आरोपी अटकेत

काल रात्री १०आॅक्टोबर रोजी एन८सिडको येथील विश्र्वास वाईन शाॅप समोर आरोपी विशाल आगळे ने त्याच्या ओळखीचा सिध्दार्थ रंगनाथ हिवराळे यास चाकूने भोसकून ठार मारले.सिडको पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी आरोपी विशाल आगळे याला गजाआड केले

Leave a Reply

आपलं सरकार