Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणात सुबोधकुमार जयस्वाल यांना समन्स

Actor Navdeep, Co Founder C Space Along With Rakesh Rudravanka - CEO - C Space

Spread the love

मुंबई : राज्यातील बहुचर्चित फोन टॅपिंग डेटा लीक झालेल्या प्रकरणात राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक आणि सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना मुंबई सायबर पोलिसांनी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. १४ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस दलातील बदल्या आणि बढत्यांसंदर्भात काही खासगी व्यक्ती, पोलीस अधिकारी यांचे फोन टॅपिंग लीक झाल्याप्रकरणी शासकीय गुपिते अधिनियम आणि इतर कलमांतर्गत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी याआधी महिला पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. याच प्रकरणात सुबोधकुमार जयस्वाल यांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई सायबर पोलिसांसमक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. जयस्वाल यांना ई-मेलच्या माध्यमातून हा समन्स पाठवण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र केडरचे १९८५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सुबोधकुमार जयस्वाल यांची याचवर्षी मे महिन्यात सीबीआय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती आहे. त्याआधी सुबोधकुमार हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते. त्यांच्या कार्यकाळात फोन टॅपिंग प्रकरण घडले होते. त्यामुळेच त्यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने समन्स बजावले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!