Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNCBNewsUpdate : आर्यनसह ८ जणांची आर्थररोड तुरुंगात रवानगी , न्यायालयात आज काय झाले ?

Spread the love

मुंबई : क्रुझवरील एनसीबीने केलेल्या कारवाईत अटकेत असलेल्या आर्यनसह सर्वच आरोपींचा जामीन अर्ज मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे आर्यन खानला आता जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात अर्ज कराला लागणार आहे. तो पर्यंत आर्यन खान याला तुरुंगात राहावे लागणार असून त्याला आर्थररोड तुरुंगात पहिल्या मजल्यावर असलेल्या बराक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आले आहे.

आज आर्यन खानला जामीन मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आज आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जामिनासाठी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अडीच तासांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आता या निकालानंतर आर्यन खानला काही दिवस मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. मुंबईतल्या समुद्रात क्रूझवर छापा मारल्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, इस्मित सिंग, नुपूर सारिका, विक्रांत चोकेर, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा यांना अटक केले होते. आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली.

पूजा ददलानीला अश्रू झाले अनावर

आज न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान शाहरूख खान याची मॅनेजर पूजा ददलानी उपस्थित होती. सुनावणीदरम्यान पूजाला अश्रू आवरणे कठीण जात होते. आर्यनती स्थिती तिला पाहवत नसल्याने ती सारखी रडत होती. दरम्यान मुंबईच्या समु्द्रातील क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी कोर्टात पार्टीच्या त्या रात्री क्रूझवर नेमके काय काय घडले याची संपूर्ण माहिती आर्यनने दिली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यनच्या वतीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तर एनसीबीने त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडली.

तुरुंगाबाहेरून अन्न घेता येणार नाही

आर्यन खानसह इतर आरोपींना काही कोरोनासदृश्य लक्षणे असल्यास त्यांची करोना चाचणीही करण्यात येणार आहे. तसेच त्यांना पाच दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे आर्यन खानला तुरुगाबाहेरचे, अर्थात घरचे अन्न घेता येणार नाही. त्यामुळे आर्यन जेवढे दिवस आर्थररोड तुरुंगात राहील तेवढे दिवस त्याला इतर आरोपींप्रमाणे तुरुंगातील अन्नच खावे लागणार आहे.आर्यनखानसह एकूण ५ आरोपींना तुरुंगाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बराक क्रमांक १ मध्येच ठेवण्यात येत आहे. सर्व आरोपींना आता तुरुंगातील गणवेश परिधान करावा लागणार आहे. तसेच या सर्वांना तुरुंगातील इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक दिली जाईल हे स्पष्टच आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!