CoronaMaharashtraUpdate : राज्यात कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राज्यात आज दिवसभरात २ हजार ९४३ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, २ हजार ६२० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय ५९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,९७,०१८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३२ टक्के एवढे झाले आहे.

Advertisements

दरम्यान राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,७३,०९२ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३९४७० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा असून राज्यात आज रोजी एकूण ३३,०११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Advertisements
Advertisements

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९९,१४,६७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,७३,०९२(११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४१,९७२ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत तर १,०५० व्यक्ती संस्थात्मकविलगीकरणात आहेत.

आपलं सरकार