Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : आयकर खात्याच्या धाडींनी महाराष्ट्र दणाणला , कर चुकवेगिरीचा संशय

Spread the love

मुंबई : कारचोरीच्या संशयावरून राज्यात आज आयकर विभागाने काही रिअल इस्टेट व्यावसायिकांवर छापे टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धाडसत्राबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, सातारा आणि गोव्यात छापेमारी करण्यात येत आहे. राज्यातील राजकीय नेत्याच्या सहकाऱ्यांविरोधात केलेल्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून काही एंट्री ऑपरेटरनादेखील छापेमारीत सामील करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रात आज आयटीने छापे घातले असताना एकूण 1050 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार (करचोरी) उघडकीस आल्याची माहिती प्राप्तिकर खात्याने दिली आहे. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमधील काही सूट्स दोन मध्यस्थींनी कायमस्वरूपी भाड्याने घेतले होते. आणि येथे त्यांच्या ग्राहकांना भेटण्यासाठी वापरत होते. याचाही शोध लागला. या छापेमारीत व्यापारी, मध्यस्थी, सहकारी आणि सार्वजनिक कार्यालये असणाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या नोंदींमध्ये विविध कोड नावांचा वापर केला गेला आणि एका प्रकरणात १० वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड होते. या शोधादरम्यान एकूण व्यवहार रु. १०५० कोटीपर्यंतचे असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान आयकर विभागाने राज्यातील २५ निवासस्थानी, १५ कार्यालयाच्या परिसरात या धाडी टाकल्या. आयकर खात्याला मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार,काही मध्यस्थ हे कॉर्पोरेटर्स आणि उद्योजकांना जमीन वाटपापासून ते सर्व सरकारी मंजुरी मिळवण्यापर्यंत मदत करीत होते. यामधील संवादासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाने अनेक डिजिटल पुरावे हाती लागले आहेत.

या छापेमारीत मिळालेल्या दस्तऐवजांमध्ये एकूण मिळणाऱ्या रोख रकमेबाबत माहिती समाविष्ट आहे. आलेली आणि येणाऱ्या रकमेचादेखील यात उल्लेख करण्यात असून प्रत्येकी याचा आकडा २०० कोटीपर्यंत असल्याचे ही सांगितले जात आहे. कोड नावाचा वापर केलेल्या व्यक्तीला ही रक्कम दिली गेल्याचे समोर आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!