CoronaMaharashtraUpdate : राज्यात कोरोनाचे २ हजार ६८१ नवे रुग्ण , २ हजार ४१३ रुग्णांना डिस्चार्ज

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात राज्यात एकूण २ हजार ६८१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या बाधितांचा आकडा ६५ लाख ७० हजार ४७२ झाला आहे. त्यापैकी ३३ हजार ३९७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर एकूण २ हजार ४१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजपर्यंत कोरोनावर मात केलेल्या एकूण बाधितांचा आकडा आता ६३ लाख ९४ हजार ०७५ इतका झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९७.३२ टक्के इतका आहे.

Advertisements

दरम्यान राज्यात हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली असताना दुसरीकडे लसीकरणाने देखील वेग घेतला आहे. राज्य सरकारने दसऱ्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यासाठी मिशन कवच कुंडल देखील जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील करोना रुग्णांची आकडेवारी देखील दिलासादायक चित्र उभं करत आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान, मृतांच्या आकड्याचा विचार करता बुधवारपेक्षा गुरुवारी कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या आकड्यात घट झाली आहे. आज दिवसभरात ४९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचा कोणताही आकडा चिंताजनच असला, तरी बुधवारी हाच आकडा ९० होता. त्यामुळे मृतांची संख्या जवळपास निम्म्यावर आली आहे. मात्र, अजूनही राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर असल्यामुळे प्रशासनासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.

राज्यात मिशन कवच कुंडलची घोषणा

दसऱ्यापर्यंत देशभरात १०० कोटी डोस देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात देखील वेगाने लसीकरण करण्यासाठी मिशन कवच कुंडल ही मोहीम राबवणार असल्याचं जाहीर केले आहे. ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आत्तापर्यंत १८ वर्षांवरील ६५ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देऊन झाला असल्याची माहिती देखील आरोग्यमंत्र्यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात 17 नवे रुग्ण

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 12 जणांना (मनपा 05, ग्रामीण 07 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 78 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 17 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 820 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 582 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 160 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (04)
देवळाई पार्क 1, अंजता हॉटेल परिसर 1, बन्सीलाल नगर 1, नंदनवन कॉलनी 1,
ग्रामीण (13)
गंगापूर 4, वैजापूर 5, पैठण 3, खुल्ताबाद 1
मृत्यू (01)
घाटी (01)
1. 35, स्त्री, पळशी खुर्द,ता.औरंगाबाद

आपलं सरकार