Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : लखीमपूर खेरीच्या घटनेवर सरकारची मृतांना श्रद्धांजली , ११ तारखेला महारष्ट्र बंद

Spread the love

मुंबई : उत्तर प्रदेशच्या  लखीमपूर खेरी  येथे  झालेल्या घटनेत  केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलावर शेतकऱ्यांची चिरडून हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेत  शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव करण्यात आला आहे.  राज्य मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहिली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभी निवेदन केले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले . दरम्यान उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर घटनेबाबत दिल्लीत  पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार निशाणा साधून  या घटनेनं जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाल्याचे  शरद पवार यांनी म्हटले  होते तर आज  ‘शेतकऱ्यांच्या हत्येसारख्या अत्यंत गंभीर विषयावर कोणतीही प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केलेली नाही. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मृत्यूचे कोणतेही सोयर सुतक राहिलेले  नसल्याचे हे द्योतक आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी कधी ट्वीट करणार? असा प्रश्न जनतेला पडला आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीने काँग्रेसनेही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीचा बंद

दरम्यान लखीमपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने  ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद  घेऊन सांगितले कि , ‘लखीमपूरची घटना अत्यंत गंभीर आहे. एका मंत्र्यांचा मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून ठार मारले आहे. यात त्याचा सहभाग दिसून येत आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारणे असे  कुठेही सरकारने  केले  नाही जे उत्तर प्रदेशात भाजप सरकारने  केले  आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

‘ शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले  असताना हे कृत्य करण्यात आले  आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात आतापार्यंत ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भाजपची समाजकंटकाबाबतची ही भूमिका स्पष्ट करणारी आहे. जनरल डायर च आठवण करणार हे कृत्य आहे’ अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

भाजपची महाविकास आघाडीवर टीका

आजच्या  कॅबिनेट बैठकीत लखीमपूर घटनेचा  निषेध करून सरकारने दोन मिनिते  उभे राहून श्रद्धांजली वाहने हे निव्वळ राजकारण आहे, अशी टीका भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. राज्य सरकारच्या या कृतीवरही प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला. एक व्हिडीओ प्रसिद्ध करून दरेकर यांनी आपली भूमिका मांडली.

‘उत्तर प्रदेशमधील लखीमपूर घटनेबाबत महाविकास आघाडी सरकारने बंद पुकारला आहे. लोकशाहीमध्ये एखाद्या घटनेबद्दल निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण, महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये लखीमपूर घटनेबद्दल दोन मिनिटं उभे  राहून श्रद्धांजली वाहिली. हे दुर्दैवी राजकारण या ठिकाणी केले  गेले . केवळ राजकारणासाठी ही कृती केली. ‘राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी मरण पावत आहे. पण, याबद्दल सरकारमध्ये कोणतीही संवदेनशीलता नाही. केवळ राजकारणापोटी अशा प्रकारची राजकीय भूमिका घेतली जात आहे. हा बंद कोणतेही संवेदनशीलता म्हणून पुकारलेला नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!